प्रशासकीय कामे करतांनाच सामाजिक दातृत्व…

284

प्रशासकीय कामे करतांनाच सामाजिक दातृत्व…
सुधागड तालुक्यातील ग्रामसेवक मयूर कारखानीस यांची आदिवासी कुटुंबियांना किराणा सामानाची मदत..,
गावातील लहानग्यांना खाऊचे वाटप

सुधागड /पाली, (राम तुपे )— कोरनाच्या सावटाखाली सर्वसामान्य जनता, गोरगरीब व आदिवासी देखील भरडले गेले आहेत. अशा वेळी रोजच्या जगण्याची भ्रांत असलेल्या आदिवासी बांधवांसाठी येथील ग्रामसेवक मयूर कारखानीस पुढे सरसावले. प्रशासकीय कामे सांभाळून त्यांनी स्वखर्चाने नागशेत येथील आदिवासी वाडीतील 25 कुटुंबांना किराणा सामान दिले. तसेच गावातील सर्व लहान मुलांना खाऊचे वाटप केले.
मयूर कारखानीस हे सुधागड तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत. कोरनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी वाड्यापाड्यांवर काम करत असतांना हातावर पोट असलेल्या आदिवासी बांधवांच्या घरात रोजचा जेवणासाठी देखील सामान नसल्याचे दिसले. त्यावेळी कारखानीस यांनी स्वखर्चाने वाणसमान खरेदी करून ते 25 आदिवासी कुटुंबियांना वाटले. सोबतच गावातील सर्व लहानग्यांना बिस्किटपुडे देखील दिले. आपण जमेल तशी मदत गराजवंतांना करत राहणार आहोत असे मयूर कारखानीस यांनी सकाळला सांगितले.

फोटो ओळ,– पाली, आदिवासींना किराणा समान वाटतांना ग्रामसेवक मयूर कारखानीस. (छायाचित्र, राम तुपे )

जाहिरात