लॉकडाउन काळात पत्रकारांच काय ?

0
915

 

लॉकडाउन काळात पत्रकारांच काय

गोरगरीब, रोजमजुरांसाठी प्रशासन आणि सामाजिक संस्था एकवटल्यात. कोणीही उपाशी राहता कामा नये याची दक्षता लोकप्रतिनिधींही घेतांना दिसून येतंय. परंतू ग्रामीण आणि शहरी पत्रकारांच काय? मिळणाऱ्या जाहिरातीवरच्या कमिशनवर पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा कुणी विचार करणार आहे का?.
ग्रामीण भागापासून शहरी इलेकंट्रोनिक माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांचीही हीच अवस्था आहे. अनेक माध्यमात गेल्या तीन महिन्यापासून पगार नाही. लॉकडाउन काळात जीव धोक्यात टाकून बातम्यांसाठी वणवण भटकणाऱ्या पत्रकारांना या काळात जगण्याचं काय साधन आहे.
दिनदुबळ्याना किराणा, अन्न वाटप करण्यासाठी पत्रकारांचा गराडा घेऊन जाणारे लोकप्रतिनिधीही यावेळी पत्रकारांकडून काम काढून घेण्यात धन्यता मानतात. मात्र त्याला लॉकडाउन काळात आर्थिक टंचाई भासत असले याची साधी विचारपुसही करत नाही. आपला जीव धोक्यात घालून कंपनीला इंपुट्स देतांना मोठी जबाबदारी पार पाडण्याची भूमिका पत्रकारांची असते. त्यातही एक चूक पत्रकारांची नोकरीही जाण्यापर्यंत येते. वरिष्ठांची चूक बेदखल असते. तळागळात काम करणाऱ्या पत्रकारांची एक चूक नोकरी गमावनारी असते. त्यात पोलिस प्रशासनाला अंगावर घेऊन पत्रकार काम करत असतात.
अनेकदा पत्रकारांना पोलिसांच्या लाठ्याना सामोरे जावे लागत. पण याची दखल ना कुणी लोकप्रतिनिधी घेत ना काम करणारी कंपनी. सध्याच्या काळात पत्रकारांची अवस्था अत्यंत वाईट आहे. खिशात पैसे नाहीत, घरात गहू नाही, आणि बातमीसाठी कंपनीचा तगादा कायम आहे. जनसामान्यांचे प्रश्न तडीस नेणारी पत्रकारांची जमात सध्या अडचणीत आहे. चांगलं काम करणाऱ्या पोलीस प्रशासनासाठी सगळ्यांनी थाळी आणि टाळी वाजवली पण त्यांनी वाजवलेली टाळी जनसामान्य पर्यंत पोहचवनारा पत्रकाराला उपासाचे फाके पडलेत.

या पत्रकारांची खासदार, आमदार, प्रशासन दखल घेतील का?. हाच मोठा प्रश्न आहे.

एका पत्रकारांची भावनिक पोस्ट

साहेब,आमची तेवढी बातमी फोटोसह फ्रंटपेजवर किंवा दर्शनी पानावर ठळक मथळ्यात चांगली लावा बरं का..पण उद्या आलीच पाहिजे…! यासाठी सर्वच क्षेत्रातील बहुतांश लोक आग्रह धरतात…”पण सध्या जाहीरात नको. तुम्हाला दिली की,सगळेच मागतात.”..पण अडचणीच्या काळात दुर्दैवाने आपल्या हितचिंतकांना एक माणूस म्हणून पत्रकारांची कधीच आठवण होताना दिसत नाही. याचंच तर दुखं वाटते….काहो ? तो पत्रकार माणूस नाही का ? त्याला स्वत:चा परिवार नाही का ? पत्रकार हा फक्त बातमी देण्यापुर्ताच मर्यादित असतो का ? असे अनेक प्रश्न सध्या मला सतावतो आहे..सध्या कोरोनाचा पादुर्भाव वाढल्यामुळे सगळीकडे लाॅकडाऊन आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रत्येकजण जिवाच्या भीतीने घरातच बसला आहे. त्यांचीच काळजी घेण्यासाठी पोलिस, डाॅक्टर,आरोग्य कर्मचारी यांच्याप्रमाणे पत्रकार बांधव सामाजिक बांधिलकी म्हणून स्वत;चा जीव धोक्यात घालून रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत. सर्व दैनंदिन घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवून अशा कठीण परिस्थितीत कर्तव्य चोखपणे बजावणारे पत्रकार बांधव अन् त्यांचा परिवार कसा आहे ? त्यांना काही अडचण तर नाही ना…? असा क्षणीक दिलासादायक एकही शब्द अथवा फोन ऐकावयास मिळत नाही. त्यामुळे कधी-कधी हीच खंत मनाला वेदना देऊन जाते. आपण केवळ समाजाचे काहीतरी देणे लागतो,याच हेतूने पत्रकार हा इतरांना न्याय देण्यासाठी विनाकारण मोठ-मोठी माणसे अंगावर घेतो..सतत इतरांसाठी धडपडणारा हा घटक कधीही जात, धर्म,पंथ,नातं पाहत नाही. आपलं घर वा-यावर सोडून प्रत्येकाच्या कुटुंबातला सदस्य असल्यासारखा अडचणीच्या काळात सर्वांना मदत करतो. मात्र संकटात धावणारा,मदत करणारा आपला पत्रकार बांधव केवळ कौतुकाची बातमी देण्यापुर्ताच आहे काय …?*
गेला महिनाभर छोटी साप्ताहिके चालवणारे पत्रकार रस्त्यावर आलेत एक रुपयांची जाहिरात नाही आणि दरमहा हजारो रुपये खर्च होतोय हा खर्च आणि घरातील दुहेरी खर्च यामुळे ते मेटाकुटीला आलेत . अनेकांना हा खर्च झेपत नाही म्हणून साप्ताहिकच बंद करावे लागली त्यातच ही आर्थिक मंदि किती काळ राहील ? याची कल्पना येत नाही पुढील किमान दोन वर्षे कशी काढायची या चिंतेने झोप लागत नाहीये. स्थिर असणाऱ्या मोठ्या वृत्तपत्रातील अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची भीती आहे त्यामुळे नवी नोकरी कशी मिळणार हा प्रश्न आहे त्यामुळे या समाजाचे स्तंभ असणार्याचे कोणीच वाली नाही का ?
असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही…
सर्व श्रमिक पत्रकार