ग्रामीण भागात कोरोना च्या सोशल डिस्टिंगबाबत जनजागृतीचा अभाव ग्रामीण भागात प्रशासन हतबल तर नागरिक कधी होणार गंभीर

0
661
Google search engine
Google search engine

 

अमरावती:-

अमरावती जिल्ह्यातील कोरोना बाधित असणाऱ्या ची संख्या 5 झाली असून ग्रामीण भागातील नागरिक या कोरोना विषाणू बाबत गंभीर नसल्याचे दिसंत आहे.संचारबंदी दरम्यान सूट ही जीवना आवश्यक वस्तूच्या खरेदी विक्री साठी देण्यात आली आहे मात्र नागरिक भाजीपाला मार्केट,बँक,आणि फळांच्या गाडीवर गर्दी करत आहे.तर अत्याआवश्यक सेवे मध्ये फळांचा समावेश असल्याने शहरात अनेक ठिकाणी पूर्वी प्रमाणेच गाड्या लागत आहे.

चांदुर बाजार तालुक्यातील बेलोरा चौकातील कल्पना गॅस एजन्सी जवळ सकाळी 9 च्या दरम्यान सोशल डिस्टिंग बाबत लोकांना काहीच घेणं नसल्याचे चित्र होते.तर तालुक्यातील शिरजगाव कसबा या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र समोर सकाळी 10 च्या दरम्यान नागरिकांनी एकच गर्दी केली.शिरजगाव कसबा पोलिसांच्या सावध भूमिकेमुळे नंतर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.

तर ग्रामीण भागात कोरोना आणि सोशल डिस्टिंग बाबत नागरिक यांच्या मध्ये जनजागृती चा अभाव असल्याने स्थानिक पातळीवर काम करणारे प्रशासण याच्या चांगली नाकी नऊ आले आहे.तर सोशल डिस्टिंग बाबत नागरिक गंभीर कधी होणार ? हा प्रश्न चांदुर बाजार आणि शिरजगाव कसबा येथील बँक आणि गॅस एजन्सी च्या चित्र वरून चर्चेत आला आहे.तर जिल्हा प्रशासन यांनी यावर लक्ष देणे आवश्यक आहे.

फोटो:- स्टेट बँक ऑफ इंडिया शिरजगाव कसबा समोर असलेली नागरिकांची गर्दी