अंबाजोगाईत कोरोना संशयिताचा मृत्यू !

102
जाहिरात

 

 

मृत्यू चे कारण अद्याप अस्पष्ट

 

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

अंबाजोगाई : दि:-१४- येथील स्वाराती रूग्णालयात दोन दिवसापूर्वी दाखल करण्यात आलेल्या एका ४० वर्षीय कोरोना संशयिताचा आज मंगळवारी सकाळी मृत्यू झाला.

हा संशयित मुळचा ओरीसा राज्यातील आहे. एक बोअरवेलच्या गाडीवर तो मजुरी करत असे. दोन दिवसापूर्वी कोरोना सदृश्य लक्षणांमुळे त्याला स्वारातीच्या आयसोलेशन वाॅर्डात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास या रूग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सोमवारी त्याचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असून अद्याप रिपोर्ट आलेला नाही. आज सायंकाळपर्यंत रिपोर्ट येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच त्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता की नाही हे समजू शकणार असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.