*चांदुर बाजार न.प. द्वारे सॅनिटाइझर फवारणीची मोहीम जोरात* *लॉकडाऊन च्या काळात नियमित फवारणी सुरू ठेवण्याचे आरोग्य सभापती गोपाल तिरमारे यांचे निर्देश*

0
969

*चांदुर बाजार न.प. द्वारे सॅनिटाइझर फवारणीची मोहीम जोरात*
*लॉकडाऊन च्या काळात नियमित फवारणी सुरू ठेवण्याचे आरोग्य सभापती गोपाल तिरमारे यांचे निर्देश*

चांदुर बाजार

चांदुर बाजार नगर परिषदेच्या आरोग्य विभागा अंतर्गत संपूर्ण शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये या करिता करावयाची उपाययोजना म्हणून नियमित आठही प्रभागमध्ये निर्जंतुकीकरण करण्याकरिता सोडिअम हॉपोक्लोराईड ची सॅनिटाइझर म्हणून फवारणी नगराध्यक्ष रवींद्र पवार व आरोग्य सभापती गोपाल तिरमारे सह सर्व न.प. सदस्य यांचे नियंत्रणात सतत सुरू आहे.
महाराष्ट्रा सह संपूर्ण देशात कोविड १९ या आजाराची लागण होऊ नये या करिता अनेक शासकीय यंत्रणा सतत कार्यरत असताना चांदुर बाजार नगर परिषदेचे आरोग्य विभाग सुद्धा अतिशय दक्षतेने मुख्याधिकारी रविंद्र पाटील, स्वच्छता पर्यवेक्षक परिमल देशमुख, आरोग्य निरीक्षक रविंद्र जाधव यांचे नेतृत्वाखाली सर्व सफाई कर्मचारी आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडत आहे. कोरोना या जीवघेण्या विषाणूचा प्राधुर्भाव चांदुर बाजार शहरातील जनतेला होऊ नये या करिता करावयाची उपाययोजना म्हणून शहरातील आठही प्रभागमध्ये सोडिअम हॉपोक्लोराईड ची सॅनिटाइझर म्हणून नियमित फवारणीची मोहीम सुरू आहे. त्यासोबतच डासांचा सुद्धा त्रास जनतेला होऊ नये या करिता आवश्यक त्या फवारण्या सफाई कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे . रस्ते झाडाई , नाल्या मधील गाळ काढूने व उचलणे तसेच शहरातील कचरा ट्रॅक्टर द्वारे उचलणे, घरोघरी जाऊन कचरा गाळी द्वारे ओला व सुखा कचरा गोळा करणे इत्यादी कामे नियमित प्रभावी पणे न.प. च्या आरोग्य विभागा कडून केल्या जात आहे. या सर्व आरोग्य विभागाच्या कामकाजावर नगराध्यक्ष रविंद्र पवार व आरोग्य सभापती गोपाल तिरमारे यांचे सह बांधकाम सभापती आनंद अहिर,महिला व बालकल्याण सभापती मीनाताई काकडे,नगरसेवक अतुल रघुवंशी, मनीष नांगलीया,विजय विलेकर,वैशालिताई गुलक्षे,मिराताई खडसे,लविनाताई अकोलकर,चंदाताई खंडारे,नितीन कोरडे,सरदार खान, आबीद हुसेन,फतेमा बानो, वैशालीताई खोडपे,उषाताई माकोडे,जुलेखा बी शेक नजिर, नंदलालजी शर्मा,सचिन खुळे कामकाजावर नियमित लक्ष ठेऊन आपले कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडत आहे.