मोर्शी येथील उप जिल्हा रुग्णालय येथे  सॅनिटायझर ची व्यवस्था – आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनात जैन इरिगेशनचा पुढाकार ! 

0
1543
Google search engine
Google search engine

मोर्शी तालुका प्रतिनिधी :

मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनामध्ये ठानाठुनी येथील जैन फार्मफ्रेश उन्नत्ती संत्रा प्रकल्प व जैन इरिगेशन यांच्या संयुक्त प्रयत्नाने कोरोना योध्यांना व मोर्शी येथील उप जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला निर्जंतुक करण्यासाठी येथील उप जिल्हा रुग्णालयात व चार पोलीस वॅन मध्ये फ्युमिगेशन यंत्रणा बसवून आपल्या सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला आहे.

सध्या जगभरामध्ये कोरोना नावाच्या विषाणूने धुमाकूळ घातला असून त्याचे विरोधात सर्व स्तरावर लढा देणे सुरू आहे. त्यात प्रशासकीय यंत्रणे सोबतच बहुतांश सामाजिक संघटना सुद्धा आपापल्या परीने यात सक्रियरित्या सहभागी झालेल्या आहेत. पोलीस यंत्रणा व वैद्यकीय यंत्रणा यांचा प्रामुख्याने या सर्व विषयाशी येणारा संबंध जवळचा असल्याने आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने जैन इरिगेशन समूहाचे अध्यक्ष अशोकजी जैन यांच्या प्रेरणेने व मोर्शी येथील उन्नती संत्रा प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख विजयजी धाडीवाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनात येथील उप जिल्हा रुग्णालयात एक व जिल्यातील पोलिसांसाठी चार पोलीस वॅन मध्ये सॅनिटासिंग टनेल तयार करून देण्यात आले आहेत. यामध्ये दवाखान्यात येणारा प्रत्येक व्यक्ती फक्त दहा सेकंदात स्वतःला निर्जंतुक करून घेऊ शकतो तसेच यामध्ये मोशन सेन्सर सारखी अद्ययावत यंत्रणा असल्याने विजेचा वापरही कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे सॅनिटासिंग टनेल तयार करण्यासाठी  संत्रा प्रकल्प प्रमुख विजय धाडीवाल व त्यांच्या टीमने परिश्रम घेतले आहे . या सर्व यंत्रणेमुळे विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होणार असून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णणांना व बंदोबस्तावर असलेल्या समस्त कर्मचारी व नागरिकांनी याचा अवश्य वापर करावा असे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले आहे .