अत्यावश्यक सेवेच्या पास चा फायदा अप-डाऊन साठी, चांदुर बाजार तहसीलदार नसतात मुख्यालयी

0
3244
Google search engine
Google search engine

 

अमरावती //चांदुर बाजार :-

देशा बरोबर संपूर्ण जग कोरोना च्या विरोधात एकवटले असताना चांदुर बाजार चे तहसीलदार हे या बाबतीत मात्र गंभीर नसल्याचे दिसत आहे.या भीषण परिस्थिती मध्ये तालुका दंडाधिकारी यांनी भूमिका आणि निर्णय क्षमता ही तालुक्यासाठी आवश्यक असते मात्र अमरावती जिल्हाधिकारी आणि अचलपूर उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाला चक्क चांदुर बाजार चे तहसीलदार यांनी केराची टोपली दाखवली असल्याचे दिसत आहे.

तहसीलदार शिल्पा बोबडे नंतर त्यांचे शासकीय निवासस्थान खूप दिवस बंद राहिले तर तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या नाव देखील 3 महिने बद्दलविले गेले नाही.तर त्यानंतर तहसीलदार म्हणून उमेश खोडके यानि त्या निवासस्थान बाहेरील नाव बद्दलविले मात्र त्या ठिकाणी कधी कधीच मुक्कामी पाहायला मिळाले.तर कोरोना सारख्या गंभीर परिस्थिती मध्ये देखील ते संचारबंदी दरम्यान उपडाऊन करत असल्याने नागरिक यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जसा राजा तशी प्रजा अशी एक मराठी म्हण आहे.जर तालुक्याचा प्रमुख अधिकारीच मुख्यलयीन राहत नसेल तर बाकी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कडून अपेक्षा ठेवणे हे चुकीचे होणार आहे.त्यामुळे यांची चौकशी करून कार्यवाही मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहे.

तहसीलदार हे मुख्यलयीन राहत आहे की नाही याची सत्यता तपासून पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल.
*संदीपकुमार अपार अचलपूर उपविभागीय अधिकारी*