ग्रामीण भागात कशी होणार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी? ग्रामपंचायत स्तरावर प्रशासन ची भूमिका महत्त्वाची

0
1251
Google search engine
Google search engine

ग्रामीण भागात कशी होणार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी?
ग्रामपंचायत स्तरावर प्रशासन ची भूमिका महत्त्वाची

चांदुर बाजार :-

कोरोना विषाणूचा (कोव्हिडं-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी यांनी दिनांक 13 एप्रिल ला आदेश निर्गमित केला आहे.या मध्ये ग्रामपंचायत ,आणि नगर परिषद स्तरावर सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांवर आता दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनि जारी करण्यात आले आहे.रस्ते, बाजार, रुग्णालय, कार्यालय आदी सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास प्रथमवेळी आढळल्यास पाचशे रुपये दंड तर दुसऱ्यांदा आढळून आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तोंडाला मास्क न लावल्याचे आढळून आल्यास प्रथमतः दोनशे रुपये दंड तर दुसऱ्यांदा आढळून आल्यास फौजदारी कार्यवाही करण्यात येईल.

दुकानदार, फळभाजीपाला विक्रेते तसेच सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते व ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास (दोन ग्राहकांमध्ये तीन फूटचे अंतर न राखणे व विक्रेत्यांनी मार्किंग न करणे) , ग्राहकाला दोनशे रुपये तर संबंधित दुकानदार, विक्रेताला दोन हजार रुपये दंड प्रथम वेळेस तर दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कार्यवाही करण्यात येईल.
आदेशाची अवज्ञा करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अनुसार शिक्षा पात्र गुन्हा केल्याचे मानण्यात येईल. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ व महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० अंतर्गत संबंधितावर कारवाई करण्यात येईल.

*प्रतिक्रिया* :-

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या अनुषंगाने कार्यवाही करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी उपरोक्त नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी मोबाईल इत्यादीद्वारे करावी व त्यानंतर कारवाई करावी. तसेच यांचे ग्रामपंचायत स्तरावर सक्तीने अंमलबजावणी साठी ग्रामपंचायत ला कळविण्यात आले आहे.तसे लिखित आदेश देखील देण्यात आले आहे.
1)डॉ. प्रफुल्ल भोरखडे उच्च श्रेणी गटविकास अधिकारी पंचायत समिती चांदुर बाजार.