प्रशासनाला माहिती न देणे पडले महागात ; गुन्हा दाखल

0
439
Google search engine
Google search engine



उस्मानाबाद / प्रतिनीधी

“प्रशासनास माहिती न देता बाहेर जिल्ह्यातील 9 व्यक्तींना आश्रय दिला, गुन्हा दाखल.”

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (शहर): अमिरखान साबीरखान पठाण रा. टिपु सुलतान चौक, उस्मानाबाद यांनी दि. 14.04.2020 रोजी त्यांच्या पत्रा शेड मध्ये बीड येथील 8 व नांदेड येथील 1 अशा 9 मजुरांना एकत्र ठेवले. त्यांनी आश्रय दिलेल्या मजुरांची माहिती प्रशासनास देणे गरजेचे होते. त्यांच्या या कृतीमुळे कोरोना संसर्ग पसरण्याचा संभव असल्याचे माहित असतांना देखील त्यांनी स्वत:ची व इतरांची सुरक्षीतता धोक्यात आनण्याचे कृत्य केले. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. उस्मानाबाद (शहर) येथे गुन्हा दि. 14.04.2020 रोजी नोंदवण्यात आाला आहे.