परळीत पहिल्या दिवशीच केला 18 हजाराचा दंड वसूल !

0
657
Google search engine
Google search engine

 

परळी (प्रतिनिधी )नितीन ढाकणे
शासनाचे नियम पाळा, दंड टाळा : कारवाईसाठी पथकाची स्थापना केली असता पहिल्याच दिवशी तब्बल 51 जनावर कार्यवाही करत एकूण 18 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
दरम्यान अधिक माहिती अशी की
सार्वजनिक स्थळी थुंकण्यावर बंदी तसेच मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग बंधनकारक केले असून
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. सार्वजनिक स्थळी धुंकण्यावर बंदी, चेहऱ्यावर मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग पाळणे गरजेचे असल्याने याबाबीचे पालन व्हावे याकरीता गैरकृत्य करणाऱ्या व्यक्ती विरुध्द कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी शासनाचे नियम पाळून होणारा दंड टाळावा आणि सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, तहसिलदार डॉ. विपीन पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत कदम, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी केले असता आज पहिल्याच दिवशी मास्क न लावता फिरत असलेल्या 10 जणांना प्रति रु 500 दंड लावण्यात आला आहे तर सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या 40 जणांविरुद्ध प्रति रु.200 प्रमाणे दंड करण्यात आला असून विशेष बाब म्हणजे यात व्यापारी दुकानदार यांचा ही नियमाचे पालन करावे असे सांगितले होते त्यात एका दुकान दाराने हे नियम मोडल्याने या दुकादारास 5 हजार रुपयांचा दंड असे एकूण 18 हजार रुपयांचा दंड आज परळी शहरात केला आहे .तरी सर्व नागरिकांनी व व्यापारी दुकान मालकांनी दिलेल्या नियमाचे पालन करावे नियम पळून दंड टाळावे असे आवाहन केले आहे .सदरची कारवाई हि पथकाचे शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक खरात,रमेश तोटेवाड,टाकरस,मुजमुले,बुद्धे,संगिता चक्रे मॕडम,न प कर्मचारी देशमुख,कलंञी,गुट्टे,शेख जमिल, यांनी केले आहे. तरी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आॅन दी स्पाॅट कारवाई केली जाईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी .