ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या स्कॉड ची जुगार वर धडक कार्यवाही 6 आरोपी सह ,2लाख 12 हजाराचा मुद्देमाल जप्त अमरावती //

 

ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या स्कॉड ची जुगार वर धडक कार्यवाही
6 आरोपी सह ,2लाख 12 हजाराचा मुद्देमाल जप्त

अमरावती // चांदुर बाजार:-

एकीकडे संपूर्ण अमरावती जिल्हा कोरोना सारख्या महामारी सोबत लढत आहे तर दुसरी कडे अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अवैध धंदे वर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या स्कॉड ने धडक कार्यवाही मुळें आपल्या कार्याची वेगळी छाप सोडली आहे.तर अनेक ठिकाणी पोलिसांच्या कार्यवाही मुळे समाजात कोरोचा परिस्थितीत समाजसेवक म्हणून आणि आपल्या कर्तव्य ची जाणीव ठेवणाऱ्या पोलिसांचा सन्मान होत आहे.

अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन यांच्या टीम ला मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी चांदुर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील इमामपूर शेतशिवार दिनांक 14 एप्रिल ला सायंकाळी रेड केली असता यामध्ये र जुगार साहित्य (1)नगदी 23,280 रु (2) 6 मोबाईल किंमत 39,000 रु(3) 3 मोटार सायकल किंमत 1,50000 असा मुद्देमाल जमा करून
1)रवी संतोष अभ्यंकर वय33रा 2)आशीष सुधीर गवई वय 23 दोन्ही रा.इमामपुर ता चांदूर बाजार 3)बबन रामचंद्र वानखडे वय 50 4)शेख अहमद शेख लाल वय40दोन्ही रा रिध्दपुर ता मोर्शी 5)राजेद्र फागोजी निकोशे वय 43 रा ब्राम्हणवाडा गोविंदपूर ता अमरावती 6)सूरेश गोपाळराव लोखंडे वय63 रा सिध्दार्थ नगर चांदूर बाजार यांना ताब्यात घेऊन चांदुर बाजार पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही कार्यवाही अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजय आकरे,पंकज फाटे ,अजमल सैयद, दीपाली पवार ,गौरव जगताप , किशोर अढाऊ,सूरज टिप्पर, चालक राजेश आणि चांदुर बाजार चे हेड कॉस्टबल विनोद बोबडे,विनोद इंगळे,भूषण पेटे,मंगेश मस्के यांनी केली.

जाहिरात