माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी दिली मुख्यमंत्री सहायता निधी मदत – आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्फत १ लक्ष रुपयांचा धनादेश

0
2160

वरुड तालुका प्रतिनिधी /
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यभरात केल्या जात असलेल्या उपाययोजनांकरिता माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी १ लक्ष रुपये सहाय्यता निधी आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्फत धनादेश देऊन दिला आहे.
संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने गावातील गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाला दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गरजू लोकांसाठी अनेक मदतीचे हात देखील पुढे येत आहे.
याच पार्श्वभूमीवर माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९’ साठीचा १ लक्ष रुपयांचा धनादेश आमदार देवेंद्र भुयार यांच्या  सुपूर्द करण्यात आला .
राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या २५ मार्चपासून देशभरात लॉकडाउन असल्यामुळे गोरगरिबांना अन्नधान्य पुरवणे, गरजूंना औषध पुरवणे, उपचारासाठी उपायोजना करणे यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असणार आहे.
या पार्श्वभूमीवरच माजी कृषी मंत्री हर्षवर्धन  देशमुख मदतीसाठी पुढे सरसावले आहे. माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात आर्थिक मदतीचा हात पुढे करत त्यांनी एक लक्ष रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला यावेळी आमदार देवेंद्र भुयार , जी प सदस्य राजेंद्र बहुरूपी निलेश मगरदे , राजाभाऊ कुकडे ,  जितेंद्र शहा , बाळू पाटील कोहळे , प्रफुल अनासने , कृष्णा सोनारे , आदी मंडळी उपस्थित होती .