*अवैध गावठी दारू वाहतूक करणाऱ्या पोलिसांच्या जाळ्यात* *मोटरसायकल आणि 60 लिटर गावठी दारू जप्त* *अमरावती// चांदुर बाजार*

0
2062

*अवैध गावठी दारू वाहतूक करणाऱ्या पोलिसांच्या जाळ्यात*
*मोटरसायकल आणि 60 लिटर गावठी दारू जप्त*

*अमरावती// चांदुर बाजार*

अमरावती जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन हद्दीतील दिनांक 15 एप्रिल ला मध्य रात्रीच्या दरम्यान सोनोरी फाटा येथे नाकाबंदी दरम्यान ईसम नामे शुभम सुभाष गावंडे वय २० याचेवर संशय आल्याने पोलिसांनी त्यास थांबन्याचा इशारा केला .परंतु तो न थांबतां भरधाव वेगाने त्याचे ताब्यातील नविन होंडा शाईन मोटार सायकल वेगाने नेत असतांना नाकाबंदी पाॅंईटजवळच पडला व किरकोळ जखमी झाला.
पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्याचे ताब्यातील मोटारसायकलवरुन १ रबरी ट्युब मध्ये ६० लिटर गावरान दारु मिळुन आली.मो सा किंमत ६०,०००/- रु नविन विना नंबर व गावरान दारु ६० लिटर किंमत ६०००/- असा एकुन ६६०००/- रु चा मुद्दैमाल ताब्यात घेतला असुन गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कार्यवाही ठाणेदार सचिन परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉस्टबल रविंद्र शिंपी नापोका सचिन भुजाडे,विकास धंदारे,मिलिंद इंगोले यांनी केली.