लातूरमध्ये भिषण आग !

0
817
Google search engine
Google search engine

रुद्रा मुरकुटे /लातूर


लातूर शहरातील औसा रोडवरील सूर्यनारायण कॉम्प्लेक्समधील माऊली संकुलला शॉर्टसर्किटने आग लाली होती ती विझवण्यात ग्निशमक दलाला यश आले आहे.
राज्यात सर्वत्र लॉकडाउन असून रस्त्यावर गर्दी आणि वरदळ कमीच असताना लातूर मधील औसा रोड वर माऊली कॉम्प्लेक्स आहे . या कॉम्प्लेक्स च्या बाहेरील बाजूस जवळच एक विजेचा खांब आहे.या खांबावर सुरवातीला कसली तरी चकमक जाणवली यात छोट्या ठिणग्या पडत होत्या थोड्या वेळातच या ठिणग्याचे भीषण आगीत रूपांतर झाले.
जवळच असलेल्या लोकांनी आरडा ओरड करून शॉर्ट सर्किट मुळे लागलेली आग लक्षात आल्यामुळे पाणी टाकून विजवणे घातक होते.गर्दीतून लोकांनी 102 फायर स्टेशन ला संपर्क साधून तात्काळ पाचारण केले व तूर्तास फायर ब्रिगेड ची गाडी तिथे येऊन आग आटोक्यात आणण्यात यशस्वी झाली..
लातूर मधून अग्निशमक दलाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.