लॉक डाऊन सुरू असताना ही आप्त परिवारासमोर केले ‘ त्या ‘ दोघांनी लग्न….

0
909
Google search engine
Google search engine

लॉक डाऊन सुरू असताना ही आप्त परिवारासमोर केले ‘ त्या ‘ दोघांनी लग्न….

शेगांव :- सध्या भारतात लॉक डाऊन सुरू असल्याने सर्वच कार्य स्थगित आहेत. अशातच अनेकांची लग्ने सुद्धा लांबणीवर गेली आहेत. लग्नाच्या तारखाही निघून गेल्यात तर काहींच्या तारखा येणार आहेत. पण अशा परिस्थितीत लग्न समारंभ होणे कठीणच आहे.

पण तरीही ना बॅंड ना बाज्या ना बारात ना काही गाजावाजा तश्यात घरामध्ये सन, उत्सव समारंभ साजरे करण्यासाठी किती काळ उलटू द्यावे लागणार याची ठोस शाश्वती नसतांना परिस्थितीवर अवलंबून न राहता शेगाव येथील शहाणे व आंबिलकर परिवाराने एक युक्ती वापरून आपल्या घरातील लग्न लॉक डाऊनच्या काळात अवघ्या ०८ – १० आपल्या परिवारतील सदस्यांसमोर लग्न समारंभ अतिशय साध्या पद्धतीने संपन्न केले. सोबत नवीन म्हणजे ऑनलाईन पद्धतीने नातेवाईकांनी व्हिडिओ कॉल द्वारे अभिनंदन रुपी आशीर्वाद दिले. या इंटनेटच्या काळात अशा पद्धतीने सर्व सोबत असण्याचा अनुभव घेत मोठ्या आनंदात लग्न पार पडले.

हे लग्न आधीच ठरले होते पण लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर त्यांचे लग्न लांबणीवर गेले होते. म्हणून दोघां मुलगा व मुलीच्या मनाचा विचार करत दोन्ही परीवारांनी आज दिनांक १५ एप्रिल सकाळी १२ च्या दरम्यान आपल्या आप्तस्वकीयांना सोबत घेऊन घरच्या घरी दोघांचे लग्न लाऊन दिले.