दापोरी येथील संत लालदासबाबा संस्थान तर्फे मुख्यमंत्री सहायता निधी करीता ५१ हजार रुपये मदत – आमदार देवेंद्र भुयार यांचा मार्फत  मदतनिधी जमा ! 

0
838
Google search engine
Google search engine

कोरोना मदतीसाठी लालदासबाबा संस्थानचा मदतीचा हात

मोर्शी तालुका प्रतिनिधी :
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रामध्ये हैदोस घातला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाविरोधात लढ्यासाठी राज्य सरकारने सढळ हाताने मदत करावं असं आवाहन केलं आहे. त्याकरिता दापोरी येथील श्री संत लालदासबाबा संस्थानने कोरोनाविरोधात लढ्यात खारीचा वाटा उचलला आहे.
मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत लालदासबाबा संस्थान दापोरी र नं १८४३ अ तर्फे मुख्यमंत्री सहायता निधी करिता ५१ हजार रुपये आर्थिक मदत देऊन श्री संत लालदासबाबांच्या सेवाकार्याच्या विचारांची नाळ कायम ठेवली आहे. दापोरी येथे दरवर्षी श्री संत लालदासबाबा यांचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी कोरोना आपत्तीमुळे देश संकटात असतांना शासनाला मदत करण्यासाठी पुण्यतिथी महोत्सव रद्द करून शासनाला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री आपात्कालीन सहायता निधी फंडाला श्री संत लालदासबाबा संस्थान दापोरी कडून विश्व़स्त समिती तर्फे ५१ हजार रुपयांचा धनादेश आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्फत पाठवण्यात आला आहे .
सद्या देशात कोरोना १९ या रोगाने थेमान घातले असल्याने देश प्रचंड अडचणीत सापडलेला आहे. महाराष्ट्र शासन खबरदारी म्हणून सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी कोराना -१९ वर मात करण्याकरीता सहायता निधी मध्ये मदत निधी देण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुशंगाने कोरोना वर मात करण्याकरीता सामाजीक बांधिलकी जोपासत एक हात मदतीचा मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये ५१ हजार रुपयांचा धनादेश  मदतनिधी लालदासबाबा संस्थानतर्फे मदत निधी देण्यात आला त्यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांना धनादेश देतांना लालदासबाबा संस्थानचे अध्यक्ष वासुदेव होले , उपाध्यक्ष प्रकाश विघे , नरेंद्र जिचकार , विनायक पापडकर , सुरेश फलके , रुपेश वाळके , विजय पाचारे , अशोक राऊत , यांच्यासह लालदासबाबा संस्थानचे  विश्वस्त मंडळी उपस्थित होती .