सरकार पाडण्याचे पत्ते पिसणार्याना संजय राऊतांचा इशारा !

0
408

मुंबई – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार पाडण्याचे पत्ते जे कुणी पिसत असतील त्यांना मी शिवसेनेच्यावतीने इतकंच सांगू इच्छितो की, 27 मेनंतर सुद्धा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार असेल असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.तसेच राज्यपालांकडे बोट दाखवत नाही, राज्यपाल हे सदगृहस्थ आहेत, सदाचारी आहेत आणि ते महात्मा आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधीमंडळ सदस्यावरुन शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सदस्यत्वाचा निर्णय अद्यापही होत नसल्याने संजय राऊतांनी काल ट्विट केलं होतं.राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!’ असे ट्विट संजय राऊत यांनी केलं होतं.

या ट्वीटला भाजप आमदार आशिष शेलार यांनी उत्तर दिलं होतं. राजभवनाकडे तोंड करुन काल पत्रपंडित काहीतरी बोलले म्हणे काय होतं ते? आम्ही अगोदर नाव दिले नाही. यवतमाळच्या पोटनिवडणुकीत विसरलो… हे सांगायचे आहे की, राज्यपालांवर आता दबाव आणायचाय? इथे पत्रपंडित बोलायला लागले की, डरावडराव करणाऱ्या प्राण्याची आठवण होते.. समजनेवाले को इशारा काफी..’ असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं.

त्यानंतर आता संजय राऊत यांनी पुन्हा भाजपवर हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार पाडण्याचे पत्ते जे कुणी पिसत असतील त्यांना मी शिवसेनेच्यावतीने इतकंच सांगू इच्छितो की, 27 मेनंतर सुद्धा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार असेल तसेच राज्यपालांकडे बोट दाखवत नाही, राज्यपाल हे सदगृहस्थ आहेत, सदाचारी आहेत आणि ते महात्मा आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.