*लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकाराला ग्रामीण पोलिसाकडून मारहाण – शेतात फवारणी साठी औषध घेऊन जात असताना घडला प्रकार*

0
2105
Google search engine
Google search engine

 

*ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस उप- निरीक्षक वाघमोडे व शिपाई ठाकरे व इंगळे यांच्याकडून अमानुष मारहाण*

*फवारणीसाठी साहित्य घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याने चिरीमिरी न दिल्याने मारहाण*

प्रतिनिधी । कारंजा (लाड)

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात ‘लॉक डाऊन’ करण्यात आले आहे. नागरिची गैरसोय हाऊ नये म्हणून सकाळी ८ ते १२ पर्यत शेतकरी व नागरिकांसाठी शिथिलता दिली असताना सुद्धा ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस उप निरीक्षक वाघमोडे व पोलीस शिपाई नितीन ठाकरे व सतोष इंगळे यांनी पत्रकार तथा शेतकरी सुधीर देशपांडे हे फवारणी साहित्य शेतात घेऊन जात असताना दि.२१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान गंगापूर फाट्याजवळ दुचाकी थांबवून अमानुषपणे मारहाण केल्याचा घटना घडली.

 

वास्तविक पाहता ही हद्द शहर पोलीस स्टेशनची असतांना ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी चिरीमिरी साठी हा प्रकार करून लोकशाहीला दाबण्याचा प्रकार होत आहे. पत्रकार सुधीर देशपांडे वय- ५५ हे व पुतण्या शेतात टरबूज असल्याने फवारणी साहित्य घेऊन जात असताना ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे व पोलीस उप निरीक्षक वाघमाडे व शिपाही नितीन ठाकरे, सतोष इंगळे यांनी पत्रकारच ओळखपत्र तसेच मास असतांना सुद्धा तुम्हा फिरता असे धम्मकीने बोलून मारण्यास सुरवात केली. त्यामुळे देशपांडे यांच्या पाटीवर व पायावर काठीचे ओळ आहेत. तसेच अल्पवयीन असलेला पुतण्याला सुद्धा मारहाण करून चोरट्या सारख पोलिसांच्या गाडीत पकडून आणले. वास्तविक पाहता ही घटना ज्या ठिकाणी घडली ती हद्द ग्रामीण पोलिसांची नसून शहर पोलिसांची आहे. नुसती चिरीमिरी कशी मिळते याकडे लक्ष ठेऊन सामान्य नागरिका धमकावण्याचा प्रकार या काळात सुरू आहे.या घटनेचा कारंजातील सर्व पत्रकार बांधवांनी ग्रामीण पोलिसांचा निषेध नोंदवून त्या अधिकारी व कर्मचाऱ्या विरुद्ध कार्यवाही व्हावी अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदार व शहर व ग्रामीण चे ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनातून केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी संजय पाटील व तहसीलदार धीरज मांजरे ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये येऊन घटनेची माहिती जाणून घेतली संबंधित अधिकारी व कर्मचार्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी कारंजातील समस्त पत्रकार बांधवांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले.