दिवठाण्याच्या शेतकऱ्याची पि.एम केअर्समध्ये ५० हजाराची राशी

809
जाहिरात

आकोट : संतोष विणके

आकोट तालुक्यातील दिवठाणा येथील तरुण शेतकरी नितीन मनोहर वालसिंगे याने पि.एम.केअर्स फंड मध्ये ५० हजाराच्या राशीचे योगदान दिले.आकोट तालुक्यातील शेतकऱ्याने पि एम केअर्स मध्ये दिलेल्या या योगदानाने बळीराजा हा जगाचा अन्नदाता तर आहेच पन राष्ट्रीय कर्तव्य निभावण्यातही कुठेच मागे नाही हे दिसुन आले.वालसिंगे यांनी केअर्स फंड मध्ये दिलेल्या मदतीची अॉनलाईन पावती अकोट उपविभागीय अधिकारी सिद्धभट्टी यांना सुपुर्त केली

. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राष्ट्रीय आपत्ती प्रसंगी फुल ना फुलाची पाकळी मदत करावी असे देशवासीयांना आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून नितीन वालसिंगे यांनी पीएम केअर्स मध्ये आपली मदत राशी दान केली तसेच देशहितासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असा संदेश याप्रसंगी केला आहे. 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।