अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या निषेध आंदोलनाला यश – वृत्तपत्र घरोघरी वितरणाला परवानगी

0
1134
Google search engine
Google search engine

अमरावती – (शहजाद खान)

महाराष्ट्र शासनाचे दि. १८/०४/२०२० च्या आदेशानुसार वृत्तपत्रांना घरोघरी वितरणावर निर्बंध घालण्यात आले होते. त्या विरोधात अ.भा. ग्रामीण पत्रकार संघा सह राज्यातील इतर पत्रकार संघटनानी तिव्र विरोध केला होता. अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाने तर मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन हा आदेश त्वरीत मागे घेण्याची मागणी करून २०लएप्रिल रोजी संघटनेच्या सदस्यांनी व वितरकांनी काळी फित लावून सरकारच्या तुघलकी निर्णयाचा निषेध केला होता. याची दखल घेऊन राज्य शासनाच्या सबंधीत विभागाने आज २१ एप्रिल रोजी काढलेल्या सुधारित आदेशानुसार मुंबई, पुणे वगळता इतरत्र कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागु केलेल्या नियम व अटीचे पालन करून वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण करण्यास परवानगी दिली आहे. या सुधारीत आदेशामुळे आता ग्रामीण भागातील बेरोजगार मुलांना रोजगार मिळणार आहे.
अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाच्या पाठपुरावा व आंदोलनाला यामुळे बळ आले असून संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी केलेल्या परीश्रमा बद्दल संघटनेने सर्व सभासदांचे अभिनंदन केले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहे. याशिवाय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते, आजी, माजी मंत्री गण, विदर्भ डेली न्युज पेपर असोशिएशन, नागपूर यांचे अ. भा. ग्रा. पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनाेहरराव सुने, केंद्रीय महासचिव सुरेश सवळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलासबाप्पू देशमुख यांसह इतरांनी सुध्दा आभार मानले. अशी माहिती प्रसिध्दी प्रमुख सागर सवळे यांनी कळविली.