अमरावती ब्रेकिंग :- चिंता वाढवणारी बातमी :- अमरावती येथील निधन झालेल्या दोन महिलांचे कोरोना चाचणी अहवाल Positive

0
17473

अमरावती येथील निधन झालेल्या दोन महिलांचे कोरोना चाचणी अहवाल positive आले असून, आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित व्यक्तीची संख्या मयत ३ व्यक्तीसह आठवर गेली आहे.

यातील एक महिला कमिला ग्राउंड येथील असून त्यांचे वय 70 वर्षे आहे. दुसरी ज्येष्ठ महिला हैदरपुरा येथील असून त्यांचे वय 60 वर्षे आहे. दोहोंचे 20 तारखेला निधन झाले. त्यातील एक होम डेथ असून, एक महिला खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन पावल्याची प्राथमिक माहिती आहे.

या अनुषंगाने संपर्कातील व्यक्तीची तपासणी, swab घेणे व आयसोलेशन आदी कार्यवाही पथकांकडून होत आहे.