चिंता वाढवणारी बातमी – अमरावती मध्ये कोरोना बाधितांचा संख्येत वाढ

0
18613
Google search engine
Google search engine

अमरावती येथे काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार, दोन व्यक्तीचे कोरोना चाचणी अहवाल positive आले असून, आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित व्यक्तीची संख्या ४ मयत व्यक्तीसह दहा वर गेली आहे.

पाटिपुरा परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेच्या होम डेथ नंतर घेण्यात आलेले swab रिपोर्ट positive आले आहेत. त्यांचे वय ९५ वर्षे होते. त्यांचे २१ एप्रिलला निधन झाले होते.

त्याशिवाय, यापूर्वी निधन झालेल्या हैदरपुरा येथील एका महिलेच्या कुटुंबातील एका युवकाचा कोरोना चाचणी अहवाल positive आला आहे. सदर युवकास यापूर्वीच दाखल केले होते. आता
त्याला कोविड वार्डात दाखल करण्यात आले आहे. सदर युवकाचे वय 22 वर्षे आहे.

या अनुषंगाने संपर्कातील व्यक्तीची तपासणी, swab घेणे व आयसोलेशन आदी कार्यवाही पथकांकडून होत आहे.