*मोर्शीच्या नगराध्यक्षा मेघना मडघे तर्फे मुख्यमंत्री सहायता निधी करीता आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्फत १५ हजार रुपयांचा धनादेश*

0
756
Google search engine
Google search engine

कोरोना मदतीसाठी मेघना मडघे यांचा मदतीचा हात 

*_मोर्शी तालुका प्रतिनिधी :_*
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रामध्ये हैदोस घातला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाविरोधात लढ्यासाठी राज्य सरकारने सढळ हाताने मदत करावं असं आवाहन केलं आहे. त्याकरिता मोर्शीच्या नगराध्यक्षा सौ मेघना मोहन मडघे यांनी आपले पाहिले मानधन देऊन कोरोनाविरोधात लढ्यात खारीचा वाटा उचलला आहे.
सद्या देशात कोरोना १९ या रोगाने थैमान घातले असल्याने देश प्रचंड अडचणीत सापडलेला आहे. महाराष्ट्र शासन खबरदारी म्हणून सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी कोराना -१९ वर मात करण्याकरीता सहायता निधी मध्ये मदत निधी देण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुशंगाने कोरोना वर मात करण्याकरीता सामाजीक बांधिलकी जोपासत एक हात मदतीचा मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये १५ हजार रुपयांचा धनादेश  मदतनिधी मोर्शी येथील नगराध्यक्षा सौ मेघना मोहन मडघे यांच्यातर्फे मदत निधी देण्यात आला त्यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांना धनादेश देतांना नगराध्यक्षा सौ मेघना मोहन मडघे ,   माजी नगर परिषद उपाध्यक्ष मोहन मडघे , मुख्याधिकारी गीताताई ठाकरे , विजय पाचारे भोलानाथ वाघमारे ,  सोपान मडघे यांच्यासह आदी मंडळी उपपस्थित होती