अमरावती ब्रेकिंग :- चिंता वाढवणारी बातमी – नव्याने 3 कोरोना पोजिटिव्ह

0
13490
Google search engine
Google search engine

अमरावती :/

अमरावती येथे नुकत्याच प्राप्त झालेल्या 13 अहवालांपैकी एका निधन झालेल्या पुरुष व्यक्तीसह एकूण 3 पुरुष व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

युसुफनगर येथील 52 वर्षांची पुरुष व्यक्ती यांना कोविड रूग्णालयात 23 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. आज दुपारी 4 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.

दुसरी पुरुष व्यक्ती बडनेरा येथील असून, 53 वर्षीय आहे.
त्याचप्रमाणे, तारखेडा येथील 23 एप्रिलला रोजी निधन झालेल्या महिलेच्या संपर्कातील व संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलेल्या 33 वर्षीय पुरुष व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.