शहरातील भाजी बाजाराचा तिढा सुटेना भाजी बाजार स्थलांतरीत

0
1413
Google search engine
Google search engine

आकोटःसंतोष विणके

अकोट शहरातील भाजी बाजाराचा प्रश्न हा प्रशासनासाठी डोकदुखी ठरतो आहे.लॉकडाऊनला एक महीना झाला असुन महीनाभरात तिनदा भाजी बाजार स्थलांतरीत करावा लागला आहे.सुरवातीला सोनु चौक ते शिवाजी चौक मार्गावर बहुतेक भाजी विक्रेत्यांच्या दुकानांमुळं जवाहर रोडवर एकच गर्दी झाली होती. त्यामुळं प्रशासनाने भाजी विक्रेत्यांना शहरातील पाच वेगवेगळ्या ठीकाणी भाजी दुकाने लावण्याचे निर्देश दिलेत शेवटी अकोला मार्गावर हा भाजी बाजार भरवला गेला मात्र अकोला मार्गावर असणाऱ्या बॕंका एटीएम ,एंबुलन्स जिवनावश्यक वस्तुंची वाहतुक करणाऱ्या वाहनांची ये जा करणारा मुख्य मार्ग असल्याने खोळंबा होत होता.त्यामुळं शनिवार पासुन भाजी बाजार हा शिवाजी चौक ते बस स्थानक या मार्गावर हलवण्यात आला आहे

.याआधी पन आठवडी बाजारातील भाजी अडत मध्ये होणारी गर्दी व जयस्तंभ चौक ते शिवाजी चौक मार्गावर होणारी गर्दी नियंत्रीत करण्यासाठी बॕरीकेटस लावण्यात येऊन पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.मात्र याच मार्गावर विविध बँका कीराणा दुकाने मेडीकल दवाखाने पॕथलॉजी लेबॉरटरी असल्याने सोशल डीस्टनिंग राखण्यासाठी प्रशासनाला जास्त मेहनत घ्यावी लागत आहे.एकंदरीतच शहरात सुनियोजीत बाजार नसल्याने कमीआधिक प्रमाणात यामार्गावर शिस्त टीकणे हे आठवं आश्चर्यंच ठरु शकते.एवढं मात्र खरं.