अमरावती ब्रेकिंग :- पुन्हा 1 कोरोना रुग्ण आढळला – पॉझिटिव्ह व्यक्तींची एकूण संख्या 20

0
14135
Google search engine
Google search engine

काल रात्री उशिरा एका 58 वर्षीय पुरुष व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर व्यक्ती अहवालात नमूद उल्लेखानुसार नांदुरा पिंगळाई या गावाची असली तरीही गत पाच वर्षापासून या व्यक्तीचे वास्तव्य अमरावती ती येथील खोलापुरी गेट परिसरात असल्याचे निदर्शनास आले आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर व्यक्ती गत एक महिन्यापूर्वीपासून नांदुरा पिंगलाई या गावात गेलेली नाही. सदर गाव अमरावती तालुक्यात असून माऊली जहागीर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येते. आवश्यक दक्षतेचे दृष्टीने तालुका वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने गावाचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे
खबरदारीचा उपाय म्हणून सदर व्यक्तीच्या नातेवाईकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

सदर व्यक्तीला क्षयरोगाचा आजार असल्याने प्रकृती बिघडल्याने सुपर स्पेशलिटी रुग्णालयात दिनांक 22 एप्रिलला दाखल करण्यात आले होते. काल रात्री उशिरा प्राप्त माहितीनुसार त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव आल्याने त्यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात येऊन थ्रोट swab घेण्यात आले आहेत.