*ताळेबंदीच्या काळात उपासमारीचा वेदना सोसणाऱ्या दुर्बळ व दिव्यांगजनांच्या 100 पेक्षा अधिक परिवारांना VIDA संघटनेचा दिलासा*

0
1624

सहा तालुक्यामधील 31 गावांमध्ये राहणाऱ्या गरजूंना जीवनावश्यक खाद्यसामुग्रीच्या किट्सचे केले वितरण

*अमरावती -*
कोरोना महामारीला रोखण्यासाठी राष्ट्रव्यापी ताळेबंदीमुळे (लॉकडाऊन) हातावर पोट असणा-या दारिद्र्य रेषेखालील समाजवर्गाला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तेव्हा समाजातील नैराश्यग्रस्त, निराश्रित, अंध व अपंग समाज बांधवांची अवस्था तर अतिगंभीर आहे. हा दुर्बळ समाज घटक राष्ट्रव्यापी बंदच्या काळात भूकबळी ठरू नये म्हणुन गोर-गरिबांच्या मदतीला सदैव तत्पर असलेल्या, समाजाभिमुख कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या ‘व्हिजन इंटेग्रीटी डेव्हलपमेंट असोशिएशन (VIDA)’ या युवकांच्या स्वयंसेवी संघटनेने दुर्बळ घटकाला मदत करण्याचे लक्ष्य ठेऊन “शेअर अँड स्माईल” उपक्रमांतर्गत त्यांची भुक भागविण्यासाठी त्यांना जीवनावश्यक खाद्यसामुग्रीच्या किट्स वितरीत करण्याचे कार्य हाती घेतले आहे. उपक्रमाचा पहिला टप्पा दि. 10 एप्रिल ते 19 एप्रिल व उपक्रमाचा दुसरा टप्पा दि. 20 एप्रिल ते 25 एप्रिल या दरम्यान रावबिण्यात आला.
गहु आटा, तांदुळ, तूरदाळ, मटकी, बेसन, रवा, खाद्य तेल, मीठ, साखर, चहापत्ती, मिरची पावडर, हळद पावडर, बिस्कीट पुडा, कपडे धुण्याची साबण, अंघोळ करण्याची साबण आदी प्रत्येकी आठवडाभर पुरेल एवढ्या खाद्यसामुग्रीचा यात समावेश होता. मेळघाटातील चिखलदरा सह अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापुर, चांदुर बाजार व मोर्शी या अमरावती जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील आडनदी, हिरदामल, बदनापूर, चिचाटी, बागलिंगा, कुलंगणा, रामटेक, कालापाणी, वस्तापुर, बिहाली, चांदपुर, धामणगाव गढी, परतवाडा, अचलपूर, रासेगाव, पथ्रोट, वडगाव, अंजनगाव सुर्जी, कोकर्डा, हयापुर, नालवाडा, इटकी, लेहगाव, शिवर, दर्यापुर, शिरजगाव बंड, चांदुर बाजार, येरला, खानापुर, उदखेड, मोर्शी या 31 गावांमध्ये राहणाऱ्या 101 पेक्षा जास्त दुर्बळ व दिव्यांग बांधवांच्या परिवारांना हुडकुन त्यांना खाद्यसामुग्री किट्सचे वितरण त्यांच्या राहत्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सॅनिटाईझरने त्यांचे हाथ स्वच्छ करीत किटस् वितरीत करण्यात आले. या आरोग्यविषयक आणीबाणीच्या काळात कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वांनी न डगबगता एकजुट होऊन गोरगरीबांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याविषयीचे आवाहन VIDA संघटनेचे अध्यक्ष प्रितेशकुमार सूर्यकांत वाघमारे यांनी केले आहे.
उपक्रमाच्या यशस्वीतेकरिता कुलदीप भोलाने, श्री. साई मोबाईल शॉपी (अमरावती), आशिष ठाकरे, निलेश मिसाळ, मनीष धोटे, सचिन शेरेकर, गिरीश देशमुख, संतोष धिकार, अंशुल भेंडे, हर्षाली हिवराळे, राम कु-हेकर, राहुल बुरघाटे, योगिता उंबरकर यांच्यासह अनेक दानदात्यांकडुन आर्थिक वा वस्तु स्वरूपात मौलिक सहकार्य लाभले. जीवनावश्यक खाद्यसामुग्रीच्या किट्स तयार करणे, तालुक्यातील गावोगावी जाऊन लाभार्थ्याना हुडकणे व त्यांना खाद्यसामुग्रीच्या किट्स वितरित करण्याचे कार्य विडा संघटनेचे अध्यक्ष प्रितेशकुमार वाघमारे यांच्यासह सर्व सदस्य अ‍ॅड. अंकिता पाथरे, प्राची वाघमारे, जया वाघमारे, उमेश तनपुरे, मो. साबीर, सूर्यकांत वाघमारे, शेख नुरुद्दीन, अंकुश सोनोने यांनी केले