ऑनलाईन परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना कॅरिऑन लागू करा. :- आकाश खारोडे

0
4072

प्रतिनिधी:-
संपूर्ण जगावर कोरोना संकट उद्दवल आहे संपूर्ण देश एकजुटीने सामना करत आहेत. अनेक विद्यालयातील अभ्यासक्रम अपूर्ण आहे. ग्रामीण भागात इंटरनेट ची योग्य सुविधा नाही. अनेक विद्यार्थी गरीब असल्याने त्यांच्याकडे मोबाईलची व्यवस्था सुद्धा नाही.काम बंद असल्याने पैसे सुद्धा नाहीत.अश्या अनेक समस्या असल्याने ऑनलाईन परीक्षा घेणे अत्यंत कठीण होऊ शकते. समस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात संभ्रमाचे वातावरण असून परीक्षेसंदर्भात नवनवीन अफवांना पेच फुटलेला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वप्रथम लक्षात घेऊन,विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा संदर्भात योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे जमत नसेल तर सर्व लॉक डाऊन संपल्यानंतर अत्यंत कमी अभ्यास क्रामावर आधारित सेमीस्टर परीक्षा लाघोपाठ घेण्यात काही हरकत नाही. म्हणून सर्व परिस्थिती लक्षात घेता शासनाने व विद्यापीठाने विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा. अशी विनंती प्रहार विद्यार्थी संघटनेने ईमेल द्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे, शिक्षणमंत्री ना.उदय साहेब सामंत, राज्यमंत्री ना.बच्चूभाऊ कडू व संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू यांना केली आहे.