कोरोना योद्ध्यांचा बसवेश्वर समीतीद्वारा सत्कार

0
1543

आकोटः ता.प्रतिनिधी

११ व्या शतकातील थोर समाज सेवक लिंगायत धर्माचे संस्थापक जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित अकोट शहरातील सफाई कर्मचारी, ग्रामीण रुग्णलया मधील डॉक्टर व कर्मचारी पोलीस , संकट काळात सेवा देत आहे त्या सर्वाचा रवीवारी (दि.२६) बसवेश्वर समिती तर्फे सत्कार करण्यात आला.

तसेच भुलजा भुलाई मंदिर येथे मा. तहसीलदार मा.राजेशजी गुरव व नायब तहीलदार मा. हरीष गुरव यांच्या उपस्थीती मध्ये महात्मा बसवेश्वर यांना सोशल डीस्टनिंग पाळत अभिवादन करण्यात आले.यासाठी लींगायत समाजाचे प्रतीक गोरे,सागर उकंडे, विश्वास कुरवाडे,राहुल रायफळे,सोमेश कुरवाडे,कुणाल मेनसे, विपीन कैसर,महेश इंगोले,पवन डफडे,विजय गोंडागरे,महेश कुरवाडे,नितीन मेनसे, ईश्वर कैसर,सचिन डफडे,शुभम गोंडागरे, आदींनी परिश्रम घेतले.