अमरावती ब्रेकिंग – शहरात आणखी दोन रुग्ण कोरोना बाधीत – तारखेडा येथील 23 एप्रिलला निधन झालेल्या महिलेच्या संपर्कातील २ व्यक्ती

0
9568
Google search engine
Google search engine

एकूण रुग्ण 23 

 

आज सोमवारी सकाळी एका मयत वृद्ध व्यक्तीचा आणि दुपारी एका मयत महिलेच्या संपर्कातील दोन युवकांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 23 झाली आहे. त्यापैकी सात मयत असून, 12 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. चारजण बरे होऊन घरी परतले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाला. यापैकी 24 एप्रिलला दगावलेल्या ताजनगर परिसरातील 72 वर्षीय पुरुष व्यक्तीला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. 9 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे होते. सोमवारी दुपारी आणखी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तारखेडा येथील 23 एप्रिलला निधन झालेल्या महिलेच्या संपर्कातील त्या दोन व्यक्ती आहेत.
दोघेही पुरुष असून त्यातील एकाचे वय २५ वर्षे, तर दुसऱ्याचे २१ वर्षे आहे. मृत महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने संपर्कातील व्यक्तींना यापूर्वीच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. दोघेही सदर महिलेच्या संपर्कातील असून त्यांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात कोविड वार्डात दाखल करण्यात आले आहे. आज एकूण तीन अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अद्यापपर्यंत आढळलेल्या बाधितांची संख्या 23 झाली आहे.