परळी तालुक्यातील 22 स्वॕब निगेटिव्ह तर 1022 क्वारंटाईन.

0
717
Google search engine
Google search engine

एकही कोरोना रुग्ण नाही-डॉ.लक्ष्मण मोरे

परळी वैजनाथ/बीड

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

दि-२८- परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यात एक ही कोरोना ग्रस्त रुग्ण आढळुन आला नसला तरी जिल्ह्यातील आरोग्य विभाग कोरोनाचा संसर्ग कुठेही फैलाव होणार नाही याची खबरदारी घेत आहे. आज पर्यंत परळी तालुक्यातील कोरोना संशयीत 22 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
सुदैवाने या 22 जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असुन खबरदारीचा उपाय म्हणुन तालुक्यातील 1022 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत अशी माहिती परळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी पञकारांना दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्याची अधिक माहिती देताना डॉ मोरे यांनी सांगितले कि तालुका आरोग्य विभाग याबाबत अतिषय गंभिर आहे.तालुक्यातील नागापुर विभागात उसतोड 20 तर इतर 36,मोहा उसतोड 37 तर इतर40,सिरसाळा उसतोड63तर इतर110,पोहनेर उसतोड66तर इतर66,धर्मापुरी 333तर इतर581,परळी अंतर्गत उसतोड49तर इतर152 अश्या एकुण 1022 नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या त्या त्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या नियंञणाखाली क्वारंटाईन करण्यात आले आहे. परळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात उसतोड मजुर 6 तर इतर 46 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असुन परळीच्या भक्तनिवास या ठिकाणी वृंदावन वरुन आलेले 94 नागरिकां पैकी 86 नागरिकांना घरी परत सोडले असुन बाकी 6 नागरिक सध्या आरोग्य विभागाच्या नियंञणाखाली आहेत.दरम्यान कौडगाव येथील एक कोरोना संशयीताचा रिपोर्ट ही निगेटिव्ह प्राप्त झाला असुन त्या रुग्णाला अंबाजोगाई येथील स्वारती रुग्णालयात डाॕक्टारांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे.दरम्यान या संशयीत रुग्णांच्या संपर्कात आलेले कौडगावचे 9, जयगावचे 33 आणी सिरसाळ्यातील 5 जणांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. उसतोड मजुर किंवा इतर जिल्ह्यातील आलेल्या नागरिकांनी त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क करुन सहकार्य करावे व शासनाने व आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांच पालन करुन सोशल डिस्टस्,वेळोवेळी साबणाने हात धुणे,परिसर स्वच्छ ठेऊन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जागृत राहावे तरी ही ताप,खोखला,श्वसनास ञास होत असल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क करावा व कुठल्याही अफवावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन परळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी केले आहे.