कडेगांवच्या महात्मा गांधी विद्यालयात सुट्टीच्या व्हाटस अपच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम जोरदार सुरू.

Google search engine
Google search engine

सांगली / कडेगांव
रयत शिक्षण संस्थेचे कडेगाव येथील महात्मा गांधी विद्यालयातर्फे सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात विद्यार्थ्यांसाठी घरी बसून व्हाट्स अप सोशल मिडिया ग्रुपच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात केली आहे. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखा मधून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे इतर शाळांना हा आदर्शवत उपक्रम आहे.
लॉक डाऊन सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांचा शाळेशी व शिक्षकांशी काहीच संबंध नाही परीक्षाही नाहीत त्यामुळे मुलेही क्षणिक आनंदीत झाली, पुढे काय लाँकडाऊन कधी निघेल याची शाश्वती नाही.भविष्यात वाढण्याची शक्यता जास्त आहे. कारण शाळेत विद्यार्थी एकमेकांच्या जवळ जवळ बसत असतात. अगोदरच काही शाळांच्या खोल्या कमी पडत आहेत.यामुळे शाळा असो वा महाविद्यालयात सोशल डिस्टनसिंग पाळता येणार नाही.यामुळे शाळा हया कोरोनाचा देशातून किंवा त्या परीसर, गाव,तालुका व जिल्ह्यातून पुर्णपणे नायनाट झाल्या शिवाय शाळा सुरू लवकर होणार नाही असे वाटते.
पुढीलप्रमाणे येणारे २०२० ते २०२१ हे शैक्षणिक वर्ष कसे जाणार याला पर्याय म्हणून रयत शिक्षण संस्थेने संपूर्ण राज्यात अशा पद्धतीने शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पहिली ते दहावीपर्यंत आशा पद्धतीने शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे .आज घरोघरी मोबाईल झाले आहेत. विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर घेऊन संबंधित वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार केला आहे त्या द्वारे अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात केली जाते.
विद्यार्थ्यांना घरी बसून आपला वेळ चांगल्या गोष्टी साठी जाणार आहे तसेच या निमित्ताने आपल्या जीवनातील अमुल्य वेळ अभ्यासक्रमसाठी वापरला जाईल, सोशल मीडियाचा एक चांगला वापर यानिमित्ताने होणार आहे. या उपक्रमात संस्थेने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रम अगदी दररोजच्या वेळापत्रकाप्रमाणे तयार केला आहे संस्थेने नामांकित सॉफ्टवेअर्स कंपनीकडून तंत्रज्ञान घेतले आहे तसेच शिक्षकांच्या माध्यमातून प्रत्येक धड्याची स्वतंत्र पीपीटी तयार केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आकलन होणे सोपे जाईल तसेच काही व्हिडिओ तयार केले आहेत त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या काही शंका आल्यास ग्रुप वर तसेच वैयक्तिक फोनवरून निरसन केले जाते इतर शैक्षणिक संस्थानी आदर्श घ्यावा असे हा उपक्रम आहे महात्मा गांधी विद्यालयात मुख्याध्यापक श्री साठे एस जे उपमुख्याध्यापिका सौ.एन. एम. मुल्ला,पर्यवेक्षक खेडकर,संगणक शिक्षक काटे सर,अशोक शिंदे सर,बाबासाहेब शेख सर व सर्व वर्ग शिक्षक हे ऑनलाईन अभ्यासक्रम हाताळत आहेत
१३ एप्रिल २०२० पासून हा उपक्रम आपल्या विद्यालयात सुरू आहे सर्व शिक्षक दिलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाईन तास घेत आहेत व विद्यार्थ्यांचे निरसन करत आहेत. या उपक्रमाचे पालकांकडून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच ५ वी च्या नविन विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे त्यांचेही ऑनलाईन तास लवकरात लवकर सुरू करण्याचे नियोजित आहे.अशी माहिती महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर काँलेजचे मुख्याध्यापक साठे एस जे यांनी दिली.

फोटो. रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय कडेगाव.