राजमुद्रा प्रतिष्ठानद्वारा अकोटात अविरत ३१ दिवसांपासुन भोजनसेवा

0
1192
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके

लॉकडाऊनमुळे अनेक लोकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून त्यांची दोन वेळीच्या जेवण्याचीही सोय नाहीये,अश्या सर्व गरजू लोकांच्या पाठीशी उभे राहावे यासंकल्पाने शहरातील राजमुद्रा प्रतिष्ठान च्या वतीने गेल्या 31 दिवसांपासुन सतत निराधार गरजू लोकांना घरपोच जेवणाचे पॕकेटस् पोहचवण्यात येत आहेत

.लॉकडाऊन वाढले तरी ही अन्नदान सेवा अशीच निरंतर सुरु ठेवण्याचा प्रतिष्ठानच्या तरुणांचा संकल्प आहे.राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत असणाऱ्या या तरुणांना काही सेवाभावी मित्रांनी अखंड सेवेसाठी मदत केली आहे.या उपक्रमासाठी कुणी मदत करु ईच्छील्यास त्यांनी शशांक कासवे – 8605505077,कैलासभाऊ धुळे – 9822517103 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

.याउपक्रमात प्रतिष्ठानच्या शशांक कासवे,कैलास धुळे, शुभम देशपांडे,अजय शर्मा,तेजस लेंगे, पुष्पक कासवे,शुभम मुरकुटे , आशिष गवई, गणेश कुकडे आदी आविरत परीश्रम घेतआहेत.अक्षयगावंडे,मोहनइंगोले,किरणइंगळे,रोषनथारकर,पियुषबाळापुरे,अमितकाळे,बंटी सपकाळ गणेश भावे,धनराज गावंडे,संतोष भावे,अमित चव्हाण आदी परीश्रम घेत आहेत.