कोंडमध्ये टवाळखोरांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या !

0
1310
Google search engine
Google search engine

कोंडमध्ये टवाळखोरांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या !


उस्मानाबाद / प्रतिनीधी

उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथे ढोकी पोलीसांनी विनाकारण फिरणार्यांना कायद्याचा बडगा दाखावत दंड वसूल केला.आज सहा वाजण्याच्या सुमारास ढोकी पोलीसांचा ताफा दोन जिपमध्ये कर्मचार्यांना घेऊन कोंड येथे दाखल झाला.
कोरोना आजारा बाबत सध्या संचारबंदी सुरु आहे यात ग्रामिण भागातील लोक हे नियमाच उल्लंघन करत असल्यामुळे कोरोना रोगाचा फैलाव रोखण्यासाठी आज दि. १/ ५ /२०२० रोजी दंड वसुल करण्यात आला.
यात नाक तोंड उघडे ठेऊन सार्वजनीक ठिकाणी फिरणे , मोटार सायकलवर डबलसीट फिरणे , विनाकारण बाहेर फिरणे असे प्रकार करणार्या नागरीकांना चांगलाच कायद्याचा बडगा दाखवला .यावेळी ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे , सहाय्यक पोलीस फौजदार सुहास गवळी , पोलीस नाईक प्रकाश अवताडे ,पोलीस नाईक भंडारकवटे ,गजानन साबदे , पोलीस नाईक संजय जाधवर , नितीन कोतवाड, अमोल गोडगे ,भगवान मंदमुले ,सुखदेव जाधव ,चालक पोपट पवार,सोबत होमगार्ड महेश थोरात व प्रथ्वीराज शिंदे हे या पथकात सहभागी होते.यावेळी ४० लोकावर कार्यवाही करुन १७ हजार सहाशे रुपये दंड वसूल करण्यात आला.