महाराष्ट्र शासनाने डाॅक्टर आरोग्य कर्मचारी,पोलिस व पत्रकार यांना विमा जाहीर करावा या मागणीसाठी माजी जिल्हाषरीषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना दिले निवेदन

Google search engine
Google search engine

सांगली /कडेगाव
कोरोनाच्या लढाईत सरकारी सेवेतील डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्याबरोबर राज्यातील सर्व पत्रकारांना विमा जाहीर करावा, या मागणीचे निवेदन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कोवीड १९ चा प्रादुर्भाव संपूर्ण जगभर घोंगावत असताना आपण व आपली सर्वोत्कृष्ट यंत्रणा योग्य प्रकारे काम करित आहात. त्यास आपणास यश प्राप्त होताना दिसत आहे. महाराष्ट्र शासनाने सरकारी सेवेतील डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमा जाहीर केला आहे. हे अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी आपले जिवावर उदार होऊन काम करत आहेत. या सर्वाचे योगदान खूप मोठे आहे. त्यांना विमा जाहीर केला आहे ते योग्यच आहे.
कोरोनाच्या लढाईत आरोग्य कर्मचारी आणि इतर अधिकारी यांच्या बरोबर पञकारही रस्त्यावर उतरून काम करत आहे. कोरोनाच्या सर्व बातम्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वञ फिल्डवर काम करून कोरोनाची सर्व माहिती पोहचवत आहेत. या धावपळीत कोरोनाने त्यांनाही सोडलेले नाही. मुंबई येथे ५३ पेक्षा जास्त पत्रकार कोरोनाग्रस्त आहेत. यात कुणाचा बऴी गेला तर काय? पत्रकारांच्या मुला बाऴांचे काय? यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबईतील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागन झाल्याची बातमी आल्यानंतर पत्रकारांचे कुटुंब भितीने जगत होते. या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी राज्यातील सर्व पत्रकारांना विमा लागू करावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.