पोलीसांवर हल्ले व कोरोना !

0
730


पोलीसावर कोरोना व माणसांचे वाढते हल्ले !
——————————————
आज आपल्या देशात कोरोनाबाधितांचे वाढते आकडे पाहात देशाची चिंता वाढली आहे.आज देशात ११मे२०रोजी पर्यंत ७०,७६६ नागरीकांना कोरोनाची बाधा झाली आहे तर २२९४नागरीकांचा देशात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर २२,५४९जण हे कोरोनामुक्त झाले आहेत.महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या २३,४०१झाली असून राज्यात आजपर्यंत ८६८मृत्यू झाले आहेत.तर एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या १४५२१झाली असून आजपर्यंत ५२८मृत्यू झाले आहेत.राज्यामध्ये कोरोनाची संक्रमण साखळी तोडण्यासाठी लाॅकडाऊनमध्ये पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून योध्दे म्हणून कोरोनाविरूध्द एक प्रकारचे युध्दच लढत आसतांना कांही पशुसारखी हिंस्ञ माणसं पोलीसावर हल्ले करत आहेत आशा राज्यात २०७घटना घडल्या आहेत.एका बाजूला पोलीसावर कोरोना हल्ले करतो आहे तर दुस—या बाजूला माणसं हल्ले करत आहेत.या घटना थांबल्या पाहिजेत व हल्लेखोरांना कडक शासन झालेच पाहिजे…यावर प्रकाश टाकणारा प्रा.राजा जगताप यांचा हा विशेष लेख*
——————————————
कोरोना महामारीने,जगातील अनेक देशांना भयभीत केले आहे.कोरोनामुळे जगातील कांही देशामध्ये,कोरोनाच्या थैमानामुळे मृत्यूचे तांडव कसे होत आहेत.ते आपण पाहत आहोत.जगामध्ये महासत्ताक आसणारी अमेरीका, कोरोनाच्या वाढत्या आकड्यांने व मृत्यूच्या तांडवांने ओशाळली आहे.स्पेन,इटली,जर्मनी,ब्रिटन,रशिया,फ्रान्स,ब्राझील,टर्की,इराण,चीन हे देश पुरते भयभीत झाले आहेत.आपल्या भारतातही ही महामारी वेगाने पसरली!आपल्या देशात सर्वाधिक कोरोनाबाधिताचे रूग्ण, हे महाराष्ट्र राज्यात आहेत.आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणजेची मुंबई, दररोजच्या कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे …डबघाईला आली आहे.आजपर्यंत मुंबईने अनेक नैगर्गिक संकटे…पाहिली,अनुभवली.अनेक दहशतवादी हल्ले पचवले! अनेक दंगली पाहिल्या .परंतु सा—या संकटावर मात करण्यासाठी…वेळोवेळी ही संकटे परतवून लाववण्यासाठी योध्दे म्हणून,लढवय्य सैनिक म्हणून मुंबई पोलीस …निधड्या छातीने, पुढे आले!दहशतवादी हल्ल्यात… याच मुंबई पोलीसांच्या योध्द्यांनी दहशतवाद्याकडे ए.के.छप्पन व गनमशीन आसतानाही,आपल्या बंदुकीने,रिव्हाॅलवारने,काटीने दहशतवाद्यांशी सामना करतांना छातीवर गोळ्या झेलल्या!मृत्यूला कवटाळले पण दहशतवाद्यांची…”मरते दम तक!” काॅलर पकडलीच!हे मुंबई पोलीसांचे शौर्य कधीही विसरता येणारच नाही.जेंव्हा,जेंव्हा मुंंबईवर संकटे आली तेंव्हा,तेंव्हा मुंबई पोलीसांनी …त्या संकटाचा सामना मोठ्या धैर्याने केला आहे.आणि मुंबईला कधिच बंद पडू दिले नाही.मुंबईला २४तास चालूच ठेवले! मुंबईसाठी शहरातील अंदाजे चाळीस हजार पोलीस बांधव नेहमीच जागृत आसतात.आणि म्हणूनच मुंबई पोलीसांचे नाव जगात घेतले जाते.
त्यामुळेच आशा धाडशी पोलीसांना …नेहमीच, मुंबईकरांनी सलामच केला आहे!आणि त्या,त्या वेळी मुंबई पोलीसांचे मनोधैर्य वाढवले आहे.
कोरोनामुळे आज देश व विविध राज्य लाॅकडाऊन झाली आहेत.सर्वञ संचारबंदी आहे.कोरोनाची संक्रमण साखळी तोडायची असेल तर…लाॅकडाऊन हाच पर्याय आहे.या लाॅकडाऊनच्या काळात संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये…नागरीकांची गर्दी होऊ नये, यासाठी मुंबई पासून ते राज्यातील खेडेगावातील चौकात, आणि रस्त्यावर… भर उंन्हात पोलीस उभे आहेत!आज या पोलीसांच्या अफार मेहनतीनेच …आपण आपल्या घरात ,सुरक्षित आहोत!
कोरोनाबाधितावर इलाज करण्याचे काम डाॅक्टर्स,नर्स,व आरोग्य विभाग यंञणा जीव धोक्यात घालून रांञंदिवस करत आहेत.राज्यातील वीज विद्युत कर्मचारी, आपआपल्या परिसरात २४तास ,कशी विज चालू राहील यासाठी २४तास राबत आहेत.
शहर,जिल्हा,तालुका,गावपातळी येथे तेथील शासकीय यंञणा व त्यांचे अधिकारी तणावात कोरोणाचा सामना करण्यासाठी लढतायेत.
उपाशी माणसांची सोय करताहेत.
आज राज्यभरात मुंबई पासून गावखेड्यापर्यंत…कोरोनाचा पादुर्भाव टाळण्यासाठी,कोरोनाच्या विषाणूची संक्रमण साखळी तोडण्यासाठी जवळ,जवळ सव्वा दोन लाख पोलीस रस्त्यावरती उभे आहेत.जनतेच्या रक्षणासाठी ,जनतेच्या काळजीपोटी हे”पोलीस योध्दे!अदृश्य शक्तीचा सामना करताहेत.”पोलीस हे सुध्दा माणसच आहेत…पण कर्तव्य बजावण्यासाठी…ते लढवय्य म्हणून आज उभे आहेत.कोरोना महामारी अनेकांना गिळंकृत चाललेली आसतांनाही…हे पोलीस व त्यांचे अधिकारी आपल्या कुटुंबीयापासून दूर आहेत.ड्युटी बजावत आसतांना या पोलीस बांधवांना जेवण मिळत नाही,राहाण्याची निट व्यवस्था नाही,शहरात ड्युटी करणारे पोलीस तीन,महिने झाले आपल्या मुळ गावी… आई,वडील,बहिन,भाऊ,पत्नी,मुले यांना भेटायला गेले नाहित.ज्यांची घरे जवळ आहेत, ते घरात राञी—अपराञी जाण्यासाठी धजावत नाहित… कारण माझ्यासोबत कोरोनाचा विषाणू घरात आला तर!आपल्यामुळे कुटुंबाला संकटात का टाकायचे?अनेक पोलीस कुटुबापासून दूर असल्याने त्यांची मुले,पत्नी विरहात एक,एक दिवस ढकलत आहेत.पोलीस दलात अनेक महिला पोलीस आहेत.त्यांची लहान तांन्हुली मुले घरी सोडून त्या पोलीस रागिनी कोरोनाचा सामना करण्यासाठी कर्तव्य बजावत आहेत.अनेक तरूण पोलीस व अधिकारी यांनी आपली लग्ने पुढे ढकलले आहेत.लाॅकडाऊनच्या काळात रस्त्यावर उभ्या आसणा—या पोलीसांनी,आपला डबा,पाणी!रस्त्यावरील निराधार व्यक्तींना दिला!अनेक गोर,गरिबांना, परप्रांतीयांना जेवन दिले !अनेकांना मदत केली.जनतेचा बचाव केला .ज्यांना पोलीसांचे हे काम महान वाटले,महत्वाचे वाटले त्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली! आणि पोलीसांचे मनोबल वाढवले.आणि पोलीसांना सलाम केला!
पोलीस नेहमीच माणसांत आसतात.त्यांचा संबंध दररोज, वेगवेगळ्या माणसांशी येतो.माञ नेहमी त्यांना माणसांशी संपर्क करतांना भिती नव्हती. माञ सध्याच्या परिस्थितीत …”कोणत्या व्यक्तीला कोरोना झाला आहे हे कळत नसल्याने .”पोलीसमिञ आपले निष्ठेने कर्तव्य अविरतपणे बजावत राहीले…२२मार्च ते १०मे२०,दरम्यान पोलीसांनी राज्यभर कलम१८८नुसार संचारबंदीचे उल्लंघन करणा—या विरूध्द जवळ,जवळ १,०३,३४५ जणावर गुंन्हे नोंदवले १९,६३०व्यक्तींना सध्याच्या कायद्याचे उल्लंघन केले म्हणून अटक केली!विविध गुन्ह्यात जवळ,जवळ तीन कोटी,सत्याऐंशी लाख,पंन्नास हजार,चारशे चौ—यान्नव रूपये इतका दंड वसूल केला आणि विनाकारण वाहाने घेऊन फिरणारे …विनाकारण रिकामटेकडे फिरणारे यांचेवर जरब बसवली !त्यामुळेच राज्यातील शहरातील इतर नागरिकात व खेडेगावातील ग्रामस्थात हे भितीचे चिञ गेल्याने, गर्दीवर नियंञण आणले गेले .कांहींना तर उठबशा काढयला लावल्या!कांहीना कोंबडा केला!त्यामुळेच हे नियंञण मिळवता आले.राज्यात अवैद्य वाहातुक करणा—या १२९१वाहानावर गुंन्हे दाखल केले!तर राज्यभरातील पोलीस मिञांनी, राज्यभर विविध ठिकाणी ५५,७८४वाहने जप्त केली.ही कामगिरी करतांनाच जे राज्यासमोर महत्वाचे कोरोनाचे संकट होते..ते म्हणजे जे मुंबई,पुणे येथून क्वारंटाईनचे शिक्के मारलेले नागरिक राज्यभरातील शहरात,खेडेगावात विखुरले होते आशांना शोधण्यासाठी अफाट मेहनत केली …प्रवास केला आणि जवळ,जवळ,६६२क्वारंटाईनचे शिक्के मारलेल्यांना शोधले आणि विविध ठिकाणच्या “विलगीकरण”कक्षात ठेवून …कोरोनाची संक्रमण साखळी तोडण्यात यश मिळवले!आज पोलीसांच्या मेहनतीमुळेच आपण कोरोनाशी युध्द लढत आहोत.कोरोनाचा आटकाव करत आहोत.कोरोना विषाणूचा ,प्रसार होऊ नये म्हणून, पोलीस मिञ…कर्तव्य बजावत राहिले…जनतेला वाचवत राहिले आणि स्वत:माञ, हेच …”पोलीस योध्दे कोरोनाशी युध्द !लढतांनाच ,कोरोनाच्या अदृश्य हल्यात …कसे सापडले हे त्यांनाही कळालेही नाही.”या लाॅकडाऊनच्या दरम्यान … कोरोनाच्या अदृश्य विषाणूने…कोरोनाविरोधात लढणा—या , पोलीसावरच प्रचंड हल्ले केले. त्यामुळे राज्यातील ९०१पोलीसांना व१०६पोलीस अधिका—यावर कोरोनाने हल्ले केल्याने …या कोरोनाच्या हल्ल्यात ..,मुंबई ४,पुणे१,सोलापूर शहर१,नाशिक ग्रामीण१ आशा सात पोलीसांना मृत्यूच्या दाढेत! ढकलले आहे!या सातही पोलीस मिञांना सलामच केला पाहिजे!
आज आपल्या भारत देशातही कोरोनाने आपली मुळे घट्ट करायला सूरवात केली आहे.देश चिंतेत आसतानाच…देशातील जास्त कोरोबाधितांची संख्या ही महाराष्ट्र राज्यात आहे.व मुंबई शहरातली दररोजची वाढती कोरोनाबाधितांची संख्या राज्याची चिंता वाढवणारी बाब आहे…तशीच ही काळजीची बाब आहे.मुंबई लगतची उपनगरे व शहरे आणि पुणे शहरात कोरोनाची संख्या दररोजच वाढत असल्याने राज्याची चिंता गंभीर झाली आहे.
पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करता,आपल्या स्वत:च्या कुटुंबाची काळजी न करता आज कोरोनाविरूध्द लढण्यासाठी रस्त्यावर उभे आहेत.नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरू नये म्हणून गाड्यांना आडवून चौकशी करत आहेत.लायसंन्स,गाड्यांची कागदपञे ,वाहुतुकीचे परवाने चेक करत आहेत…पोलीसांनी कांहीना हटकले की,कांही नागरिक प्रतिष्ठेचा विषय करत पोलीसांशी रस्त्यावर हुज्जत घालताहेत.मनात राग धरून पोलीसावर हल्ले करताहेत आणि पोलीसांचे मनोबल खच्चीकरन करताहेत या घटनांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.
नुकतीच मुंबई येथे मरिन ड्रायव्हला एक तरूण बॅगेत कोयता घेऊन ,भररस्त्यावर धावत होता…त्याच्या हावभावावरून तो कांही तरी विपरित करायला निघाला आहे,असे तेथील पोलीस निरिक्षक व त्यांच्या सहाय्यक असणा—या पोलीस अधिका—यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी…त्या कोयताधारी तरूणाचा पाठलाग केला. तेंव्हा तो तरूण त्या अधिका—यांना कोयता उगारत होता.आशा परिस्थितीत त्या पोलीस अधिका—यांनी त्याला हिंमतीने पकडले. तेंव्हा त्या तरूणाने एका पोलीस अधिका—याच्या हातावर कोयत्याने वार केला…!आणि ते अधिकारी रक्तबंबाळ झाले!हे चिञ टी.व्ही.वर आपण सगळ्यांनी पाहिले.एका बाजूला कोरोनाचे विषाणू पोलीसावर हल्ले करत आहेत .तर दुस—या बाजूला…ज्या जनतेचे रक्षण व्हावे म्हणून ड्युटी करणारे पोलीस आहेत त्यांचेवर जनतेतील कांही माणसंच हल्ले करत आहेत.हे पाहाता या हल्लेखोरांची भयानक चिड येते आणि त्यांचा निषेध करावा वाटतो.
आज आपल्या राज्यामध्ये,कोरोनाचा सामना करणा—या व ड्युटीवर आसणा—या पोलीसावर,वेगवेगळ्या ठिकाणच्या हल्लेखोर माणसांनी हल्ले केलेत. १०मे२०पर्यंत,पोलीसावर हल्ले होणा—या एकुण २०७घटना, घडलेल्या आहेत.या घटनेतील गुंन्हा करणा—या७४७ व्यक्तींना ताब्यात घेतले आहे व त्यांच्या वरती पुढील कारवाई करण्याचे काम आज पोलीस करत आहेत.
पोलीसावर जीवघेना हल्ला करणारी वेदनादायक घटना दि.९/५/२०रोजी, बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील, लाखलगाव शिवारामध्ये घडली!
तेथे ड्युटीवर आसणारे पोलीस कर्मचारी, यांनी रस्त्यावर एक गाडीचालक, गाडी घेऊन कोणताही परवाना नसतांना, जात होता.तेंव्हा त्याला पोलीसांनी हटकले व पुढे जाऊ दिले नाही. याचा राग त्या गाडी चालकांने मनात धरला आणि त्याने पोलीसावर राग काढण्याचा निर्दयी डाव आखला आणि त्या शिवारात त्या पोलीसांना मारण्यासाठी गावातील… २०ते२५जणांना बोलावले… व तेथील दोन पोलिसांना अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण केली…! या मारहाणीमध्ये तेथील दोन पोलीस आपले कर्तव्य बजावत होते त्यांच्यावर तेथील त्या माॅबने जीवघेना हल्ला केला!त्या हल्ल्यामध्ये तेथील पोलीस कर्मचारी विशाल मुजमुले व आकाश जाधव हे जखमी झाले!या दोन पोलिस बांधवांना त्या माॅबने बेदम मारहाण केली…त्या माॅबपुढे त्यांची काटी त्यांचे संरक्षण करू शकली नाही…!या मारहाणीत… विशाल मुजमुले या पोलीस बांधवाच्या कानावर त्या पीसाळलेल्या हैवानांनी कानावर प्रचंड हल्ला केला …तेंव्हा त्यांच्या कानावर प्रहर भला मोठा झाला…आणि तापत्या वैशाख ओनव्यात..,त्यांच्या कानातून लाल रक्त सांडू लागले…”बंद नळातून एक,एक पाण्याचा थेंब टिपकावा!”तसेच त्यांच्या कानातून रक्त वाहात होते!त्यांच्या कानातून रक्तस्राव झाला!कित्तेक वेळ ते रक्त सांडत राहिले.या माॅबने नंतर लक्ष केले ते आकाश जाधव या पोलीसावर…त्यांच्या डोळ्यावर या हिंस्ञ माॅबमधील कांहीनी वार केला !आणि त्यांच्या नाजुक डोळ्याखालून…लाल रक्त सांडायला लागले!कोरोनाविरूध्दचे युध्द लढणा—या या पोलीस योध्द्यांना जर हे लोक मारत आसतील तर या हल्लेखोरांना माणुस म्हणायची लाजच वाटते! हिंस्ञ पशुसारखीच ही माणसं म्हणावी लागतील!या जखमी पोलीस बहाद्दरांना बीड येथील रूग्णालयात दाखल करावे लागले.बीडचे पोलीस अधीक्षक मा.हर्ष पोद्दार यांनी ज्या दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या ,हद्दीत घटना घडली. तेथे जाऊन वरिष्ठ पोलीस अधिका—यांना गंभीर सूचना दिल्या आहेत की ,या आरोपीला कडक शासन झालेच पाहिजे.या घटनेत त्या परिसरातील १९जणांवर गुंन्हे दाखल केले आहेत. या हिंंस्ञ हल्लेखोरापैकी११जणांना पोलीसांनी अटक केली आहे तर जे ८आरोपी बिळात लपून बसले आहेत त्याचा तेथील पोलीस शोध घेताहेत.या घटनेमुळे तेथील पोलीस बांधवांचे मनोबल खच्चीकरण झाले आहे.ही पोलीसावर हल्याची जी घटना घडली ती ह्यदय हेलावून सोडेल अशीच आहे.
ही घटना ताजी आसतांनाच काल नाशिक जिल्ह्यातील नांदगाव चेकपोस्टवर तेथील दोन पोलीसांनी एक जणांच्या नातेवाईकाची गाडी जाऊ दिली नाही म्हणून त्यांने गावातील कांही माणसांना बोलावले आणि एखाद्या चिञपटातील खलनायकाच्या स्टाईलने टी.शर्ट घातलेल्या जाड्या माणसांने …तिघा,चौघांणी तेथील दोन पोलीस बांधवांना बेदम मारहान केली…त्या पोलीसांची वर्दी फाडली!ही ,पोलीसांना मारणारी, माणसं हिंस्ञ पशुसारखीच दिसत होती…या हल्ल्यात पोलीसांची वर्दी फाटली,आतील बनीयन फाटले!आणि त्यांच्या बसायच्या खुर्च्याही फोडल्या! या मारहाणीत…त्या पोलीसांचे घाबरलेले चेहरे…त्यांच्या चेह—यावरिल तणाव…पाहवत नव्हता…पोलीसावर हिंस्ञपशुसारखे हल्ले करणारे हे हरामखोर हल्लेखोरावर तिखट लाल मीरचीचे पाणी टाकुन दंडुक्यांनी फोडले पाहिजे!तरच या हल्लेखोरावर जरब बसेल!अन्यथा हे असेच गुंन्हे वाढत जातील.
या घटनेवरून आफण व्यथीत झालो आसतानाचा आशीच निंदणीय पोलीसावर हल्ला झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव चेकपोस्टवर घडली!तेथे कर्तव्य बजावणा—या पोलीसांना आशीच मारहाण केली.एका पोलीसाच्या डोळ्यावर मारहाण केल्याने एका पोलीसाच्या डोळ्यातून रक्त वाहात होते.
या लाॅकडाऊनच्या काळात राज्यातील पोलीस मिञांनी व त्यांच्या अधिकारी यांनी मुंबई,पुणे,ठाणे,नागपूर या विविध शहरात,गावखेड्यात संकटकाळातील अनेकांना मदत केली व खाकी वर्दीतील माणुसकी दाखवली! ती माणुसकी या हल्लेखोरांनी का विसरली?कळत नाही .पुणे येथे दि.३मे रोजी,हडपसर येथे पोलीसांनी एका चांगल्या कुटींबातील…”वधू वराचे लग्न लावून दिले!” त्या प्रसंगात …वधू व वर यांच्या आई,बापाची,मामाची,वरबापाची,व—हाडीची सगळी भूमिका पोलीसांनी पार पाडली कदाचित असे लग्न पोलीसाकडून लावण्याची घटना भारत देशातील पहिली असेल! ही पोलीसांची संचारबंदीतील न विसरणारी घटना आहे.
दि.७मे रोजी,मुंबई येथील ३१मजूरआपल्या लहान मुले व बायकासोबत मुंबई ते कर्नाटक पायी प्रवासाला…वैशाखातील तापतं उन डोक्यावर घेऊन चालत होते…ते लोणावळा जवळील खंडाळा येथे पोहचले होते तेंव्हा खोपोली पोलीसांना त्या गरिब मजूरांना जेवण,पाणी देऊन एक बस करून कर्नाटकाला रवाना केले त्या मजूरासाठी खोपोली पोलीस देवदूतच ठरले,ही खाकी वर्दीतील माणुसकी सलाम करण्यासारखीच म्हणावी लागेल!
दि.१०मे रोजी, एका चॅनलवर… “ठाणे येथील ,परप्रांतीय कांही मजूर..पोलीसांचा डोळा चुकावन्यासाठी एका नाल्यातून… जात आहेत ही बातमी चालवली होती…”तेंव्हा ठाणे येथील पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी
त्या चॅनलवर येऊन त्या चॅनलला सुनावले होते…”हे मजूर जीवघेना प्रवास करत आहेत हे तुमच्या प्रतिनिधीला दिसते तुंम्ही बातमी करता!बातमी पेक्षा ही घटना कोठे घडली आहे हे जर आपण आम्हाला कळवले तर ताबडतोब पोलीस तेथे जातील व मजूरांना मदत करतील!आज बातमी महत्वाची नसून नागरीकांचे जीव महत्वाचे आहेत.”
पुढे त्यांनी हे सांगितले की,ज्या ज्या रस्त्यावर…असे चालणारे मजूर पोलीसांना दिसतील त्या सा—यांनाच आंम्ही आपल्या राज्याच्या सिमेपर्यंत बसने सोडत आहोत.आणि त्यांनी पायी चालणा—या मजूरांना बसने सोडले ही!ही पोलीस अधिकारी यांची तत्परता दिसली.आशा पोलीस अधिकारी व पोलीस यांचे मनोबल वाढवण्याऐवजी कांही माणसं पोलीसावर हल्ले करून त्यांचे मनोबल खच्चीकरण करत आहेत.पोलीसावर होणारे वाढते हल्ले चिंतेची बाब झाली आहे.पोलीसावर हल्ले करणा—या ,हल्लेखोरांना कडक शासन झालेच पाहिजे!

प्रा.राजा जगताप
उस्मानाबाद
मो.नं.९८८११८८२६३

——————————————