अमरावतीत रुग्णसंख्या ५३ ; निर्बंध अधिक कडक करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत

0
7645
Google search engine
Google search engine

 

अमरावती शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मागील चोवीस तासात १० नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे अमरावती शहरातील एकूण रुग्णसंख्या आता ५३ वर पोचली आहे. तर अमरावतीच्या ग्रामीण भागातही नव्या रुग्णांची नोंद होत असल्याने प्रशासना सोबतच अमरावतीकर नागरिकांची चिंता वाढली आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या १० रुग्णांपैकी तिघांचा मृत्यू झाला असून ७ जणांवर अमरावतीच्या कोविड-१९ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता अमरावती जिल्हा रेड झोन मध्ये असल्याचं जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केलं असून अमरावतीकर नागरिकांना अत्यावश्यक सेवा-सुविधांशिवाय कुठल्याही अन्य कारणासाठी बाहेर जाता येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय कोरोनाचा जिल्ह्यातील प्रसार पाहता शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये असलेल्या पोलीस चौक्यांवर आता अधिक कडक बंदोबस्त लावण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. यासोबतच अमरावती महानगर पालिकेच्या माध्यमातून एक मोबाईल ऍप तयार करण्यात येत असून या ऍपच्या माध्यमातून अमरावतीकर जनतेच्या सूचना प्रशासन मागवणार असल्याच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितलं.
________________________