अवैध दारू वर पोलिसांची धडक कार्यवाही 7 लाखाचा वर मुद्देमाल आणि मोटरसायकल जप्त अमरावती ग्रामीण पोलिसांची कार्यवाही

Google search engine
Google search engine

अवैध दारू वर पोलिसांची धडक कार्यवाही 7 लाखाचा वर मुद्देमाल आणि मोटरसायकल जप्त
अमरावती ग्रामीण पोलिसांची कार्यवाही

अमरावती:-

                     कोरोना सारख्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे आणि काही जण आपापल्या परीने मोठ्या प्रमाणात अवैध धंदे करून अधिक जास्त आर्थिक स्थिती भक्कम करण्याच्या मागे लागले आहे.तर सर्वात जास्त गावठी दारू आणि गुटखा ची विक्री जोरदार सुरू आहे.आज आज दिनांक 2 मे ला काजळी येथील गावबंदी दरम्यान गावकरी आणि पोलिसांनी जवळपास 100 लिटर गावठी दारू आणि mh 27 cg 1721 मोटरसायकल आणि फरार झालेले आरोपी यांचा शोध सुरू आहे.तसेच गुप्त माहिती च्या आधारे त्यांनी कोदोरी येथील नदीपत्रात मधील जवळपास 7 पिपे गावठी दारूचा सडवा नष्ट केला आहे.अंदाजित किंमत 40000 हजार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

          ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन च्या मध्यप्रदेश सीमेला लागून असलेल्या गावठी दारूच्या अढ्यावर पोलिसांनी धाल टाकून 43 ड्रम मोह सडवा 160 लोखंडी डब्बे मोह व 35 हातभट्टी असा एकूण 463500 माल जागीच नष्ट करण्यात आला आहे. तर मध्यप्रदेश   मधील पोलीस आणि महाराष्ट्र मधील पोलीस यांनी संयुक्त कार्यवाही करत पोलीस स्टेशन शिरजगाव कसबा मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या  गावठी दारू तयार करण्याच्या अढ्यावर कार्यवाही करत 108 पिंप त्यात 15 लि. प्रत्येकी, 42 रबरी ट्युब 30 लि. प्रत्येकी प्रमाणे एकुण 20850 लिटर मोहा सडवा व साहित्य असा एकुण रू. 2,04,780/- चा माल जागीच नष्ट करण्यात आला.

        या कार्यवाही मध्ये अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन,अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे,अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या स्कॉड चे इनचार्ज अजय आकरे सहायक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी ,चांदुर बाजार पोलीस स्टेशन चे ठाणेदार उदयसिंह साळूके,शिरजगाव कसबापोलीस स्टेशन चे ठाणेदार गोपाल उपाध्यय ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन चे ठाणेदार सचिन परदेशी,अमरावती ग्रामीण च्या आरसिपी क्रमांक 2 आणि 3 स्थानिक पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांनी केली.

बॉक्समध्ये मध्ये
पोलिसांच्या या कार्यवाही मुळे अवैध गावठी दारू करणारे यांचे चांगलेच धावे दणाणले असून त्यांच्या या कार्यवाही चे संपुर्ण जिल्हात कौतुक होते आहे तर ग्रामीन पोलीस अधीक्षक याची देखील या कार्यवाही ची चर्चा ग्रामीण भागात सुरू झाली आहे.