काजळी गावच्या सुरक्षिते करिता युवकांचा पुढाकार दिवस रात्र असते गाव बंदी, अमरावती/चांदुर बाजार

काजळी गावच्या सुरक्षिते करिता युवकांचा पुढाकार
दिवस रात्र असते गाव बंदी,

अमरावती/चांदुर बाजार :-

कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव आपल्या गावाला होऊ नये या साठी अमरावती जिल्ह्यातील काजळी गावातील युवकांनी पुढाकार घेऊन यशस्वी अशी गाव बंदी केले आहे. तसेच बाहेर गावातून गावात येणाऱ्या सुद्दा प्रवेश नाकारला आहे.तर या साठी गावातील नागरिकांनी आवश्यक सहकार्य करण्याची अपेक्षा युवक करत आहे.

आपल्या गाव ची काळजी आपणच घ्यावी या उद्देशाने काजळी गावातील युवकांनी गावबंदी केली आहे.तसेच बाहेरून येणार्या अनेकांची तपासणी ही सोशल डिस्टिंग ठेवून करीत आहे. बाहेर गावातुन अनेक जण रात्रीच्या दरम्यान गावात प्रवेश करीत आहे.तसेच दुबलिकेत पास चा वापर करून वाहतूक करीत आहे.अश्या सर्वांची तपासणी नाकेबंदी प्रतिनिधी करीत आहे .

या मध्ये काजळी येथील उपसरपंच वासुदेव देशमुख, पोलीस पाटील दिनेश देशमुख, प्रशांत राजस,स्वप्नील देशमुख, शुभम निचत,गौरव फूसे, अक्षय कपले, शुभम देशमुख, हे गावाच्या सुरक्षा साठी रात्रभर आणि दिवसभर पहारा देत आहे..