सेवानिवृत्तीतही एका शिक्षकाची रस्त्यावर कोरोनाला हद्दपार करण्यासाठी देशसेवा

Google search engine
Google search engine

सांगली / कडेगांव

कोरोना विरुद्धच्या लढाईत आपलाही काहीतरी सहभाग असावा, असे प्रत्येक व्यक्तिला वाटत असते. मग तो सहभाग कशाच्याही माध्यमातून असू शकतो. कोणी पैशाच्या माध्यमातून, आरोग्यसेवेच्या माध्यमातून तर कोणी गरजुंना अन्न पुरविण्याच्या माध्यमातून या महामारीच्या लढाईत आपले योगदान देत आहेत. यामध्ये आता कला शिक्षक शाहजी लांडगे सेवानिवृत्ती होऊन ही देशसेवा करण्यास
ही मागे राहिलेले नाहीत.

कडेगाव तालूक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या मोहित्यांचे वडगाव येथील विद्यार्थी विकास विद्यालयातील एक आगळे-वेगळे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असणारे सहाय्यक कला शिक्षक श्री. एस्. एस्. लांडगे (सर) हे दिनांक ३० एप्रिल २०२० रोजी सेवानिवृत्त झाले. मात्र शाळांना सुट्टी असतानाही लांडगे सर दि. २५ मार्च पासून स्वेच्छेने आर. एस्. पी. अधिकारी म्हणून लाँकडाऊन काळात कडेगांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विपिन हसबनिस यांनी संधी दिल्यामुळे पोलिसांना मदत करीत बंदोबस्तासाठी कडक उन्हात खडे आहेत. विषेश म्हणजे बंदोबस्तात असतानाच ते सेवानिवृत्त झाले. आयुष्यभर जेथे सेवा केली तेथे सेवानिवृत्तीचा सत्कार भाग्यात नव्हता, पण त्यांचा सेवानिवृत्तीचा सत्कार रायगाव या गावी (फाट्यावरती) नाकाबंदी बंदोबस्त करीत असलेल्या ठिकाणी सांगली जि.प.मा.अध्यक्ष व पलूस कडेगाव मतदार संघाचे युवा नेते संग्रामसिंह देशमुख व पोलिस अधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी संग्रामसिंह देशमुख यांनी शहाजी लांडगे सरांच्या कार्याचे कौतुक केले.सध्याच्या कोरोना लॉकडाऊन काळातील मुझसे पहले मेरा देश या तत्त्वानुसार ते सध्या रायगाव येथे आर. एस्. पी. अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याचा कडेगाव तालूक्याला अभिमान आहे.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लोकांनी घरीच राहून आपल्यासकट सर्वांचेच आरोग्य व हित जपले जाईल ह्याची दक्षता घ्यावी.सुरक्षित रहा, घरीच रहा, प्रशासनाचा आदेश पाळा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा असे आवाहन यावेळी देशमुख यांनी केले.