परळीच्या ‘शिक्षण’ क्षेत्रातील तेजस्वी सूर्य — प्राचार्य डॉ.बी.डी.मुंडे

0
671
Google search engine
Google search engine

परळी :प्रतिनिधी
‘शिक्षणातून माणसांची मने सुसंस्कृत होतात, उदात्त होतात; राष्ट्रीयत्व व मानवता निर्मिती त्यातून घडते !’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. या दृष्टीने महाराष्ट्रातील अनेक समाजधुरीण आणि शिक्षण तज्ञांनी आपापल्या परीने परिश्रम घेत प्रयत्न केले. शिक्षणाच्या माध्यमातून समतेचे शांततेचे व त्यातून प्रगत संस्कार संपन्न जीवन जगण्याचे मर्म कळाले. हीच प्रेरणा, विचार आत्मसात करून गेल्या कित्येक वर्षापासून शिक्षण क्षेत्रात प्राचार्य डॉ.बी.डी. मुंडे हे नाव विशेषत: बीड जिल्हा आणि परळी या पवित्र वैजनाथाच्या भूमीत निष्ठेने कार्य करताना दिसत आहे !

प्राचार्य डॉ.बी.डी. मुंडे यांचे मूळ गाव तळेगाव. असं असलं तरी कर्मभूमी परळी वैजनाथ आहे. शेतकरी कुटुंबात राहून अतिशय कष्ट व खडतर परिश्रम घेऊन त्यांनी ‘एम.ए., एल. एल. एम., एम .फिल., पीएचडी या अति उच्च पदव्या संपादन करून एक मोठे दिव्य पार केले आहे.

‘कायद्या’ची पदवी घेतल्यानंतर वकिलीच्या व्यवसायाला श्रीगणेशा करण्यापूर्वी मुळातच सरांचा पिंड शिक्षण हा असल्याने आणि प्रा.टी.पी. मुंडे सरांच्या आग्रहावरून येथील जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात ‘प्राचार्य’ पदावर विराजमान होऊन पवित्र शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाच्या कार्याचा प्रारंभ केला…

जेष्ठ नेते व तमाम जनतेचे आधारस्तंभ प्रा.टी.पी. मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. बी.डी. मुंडे सरांनी महाविद्यालयाची सूत्रे हातात घेताच विद्यार्थी संख्या वाढीस मदत झाली. कॉलेजमध्ये विविध कलागुणांना वाव मिळाल्याने तसेच नियमित अभ्यासाच्या तासिका यामुळे गुणवत्तेतही येथील विद्यार्थी विद्यापीठाच्या परीक्षा आणि स्पर्धेत चमकले.

मुळातच बी.डी. सरांमध्ये दूरदृष्टीपणा, आत्मीयता, जिव्हाळा आणि प्रेमळपणा असल्याने सर्व क्षेत्रातील थोरामोठ्यांशी त्यांचे स्नेहाचे नाते तयार झालेले आहे.

सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आदीसह विविध क्षेत्रात सदैव अग्रेसर आणि एकरुप होतात. त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी विविध सन्मानाचे पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याला प्रेरणा दिली आहे. आदर्श प्राचार्य पुरस्कार, समता परिषदेचा पुरस्कार, परळी भूषण पुरस्कार आदीसह अनेक पुरस्कारांनी त्यांचा यथोचित गौरव झाला आहे.

‘ढाई अक्षर प्रेम के’ या पुस्तका बरोबरच ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तक ही सरांचे प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

शिक्षण सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष, विनाअनुदानित महाविद्यालय, कृती समितीचे अध्यक्ष, तळेगाव सेवा सोसायटीचे चेअरमन यासह अनेक सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध पदे त्यांच्याकडे आहेत. त्यावर ते अत्यंत प्रामाणिकपणे कार्य करताना दिसतात.

एकंदरीत, सर्वसामान्य परिस्थितीतून उच्च शिक्षण घेतल्यानंतर बीड जिल्ह्यातील नव्हे ; तर मराठवाड्याच्या मातीत संस्कारांची बीजं रुजवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे प्राचार्य डॉ. बी.डी. मुंडे सर यांचा आज अभिष्टचिंतनाचा दिन आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्या भविष्यातील कार्याला आणि आनंदी सुखी जीवनाला खूप शुभेच्छा…!

प्रा.बिभिषण चाटे,
———————–
9075785441

—————————————-