चांदुर बाजार  मधील परराज्यातील निवासी त्यांच्या गावाकडे रवाना –  प्रशासनाचे मानले आभार

0
1610

 

चांदुर बाजार :- केंद्र शासनाने आदेश जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात, तालुक्यात  अडकलेल्या विविथ स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, इतर नागरिक यांना त्यांच्या राज्यात पाठविण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला.

आज चांदुर बाजार येथुन उत्तर प्रदेश मध्ये  वास्तव्याला असणारे व चांदुर बाजार येथे गुपचूप, लस्सी चे व्यवसाय करणारे  पुरुष , स्त्रिया, लहान मुलांना  त्यांचा मूळ गावी जाण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली व स्थानिक बस स्थानकातून आज एसटी बस ने त्या सर्वांना मार्गे परतवाडा अंजनगाव आकोट  वरून अकोला रेल्वे स्थानकाकात सोडण्यात येणार आहे तदनंतर तिथून विशेष ट्रेन ने त्यांना कानपूर व लखनऊ पाठवण्यात येणार आहे  यात 23 प्रौढ प्रवासी तर 5 लहान बालकांचा समावेश आहे. यावेळी सोशल डिस्टनसिंग चे पालन करत  त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी तहसीलदार श्री उमेश खोडके , तसेच त्यांचे सर्वच कर्मचारी यावेळी उपस्थित होते