राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कडेगाव तालुक्यात फेस शिल्ड कव्हरचे व विविध साहित्याचे वाटप.

Google search engine
Google search engine

सांगली /कडेगावः न्युज:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व नामदार जयंतरावजी पाटील साहेब जलसंपदा मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट यांचेकडून कडेगाव, कडेपुर, हिंगणगाव बु!!, नेवरी* या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना विषाणू निर्मित महामारीच्या विरुद्ध लढण्यासाठी राबत असलेल्या डॉक्टर्स, नर्स,आशा वर्कर तसेच मेडिकल ,पोलीस कर्मचारी आणि इतर विभागातील कोरोना विभागात काम करणारे कर्मचारी यांना वाटण्यात आले.
पलुस कडेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ट नेते,
क्रांती उद्योग व शिक्षण समूहाचे अरूण आण्णा लाड,युवक नेते, गटनेते जिल्हापरिषद सांगली शरद भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कडेगाव यांच्या तर्फे फेस शिल्ड वाटप करण्यात आले

यावेळी राट्रवादी काँग्रेस कडेगाव तालुका अध्यक्ष जयदिप यादव (काका
अध्यक्ष, युवक राष्ट्रवादी अध्यक्ष सुरेश शिंगटे,सरचिटणीस अमोल पाटीलओबीसी सेल अध्यक्ष सिकंदर मुल्ला, कडेगावचे जेष्ट नेते रामभाऊ निर्मळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष जयदिप यादव म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोरोनो. या महामारीच्या मुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांना तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना महाराष्ट्रात करण्यात येत आहेत. विविध ठिकाणी पक्षाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.याचाच एक भा म्हणून कडेगाव तालुक्यात कोरोनोसाठी काम करीत असलेल्या विविध विभागातील महिला व पुरूष कर्मचारी यांना फेस शिल्ड कव्हलचे वाटप करण्यात आले आहे.
कार्यक्रमास यावेळी पवन नलवडे,पलूस तालुका सरचिटणीस,संदिप मुळीक
उपाध्यक्ष विध्यार्थी संघटना पलूस
.रमेश कदम,विशाल यादवपंकज भोसलेकुमार देसाई,जगदीश देशमुख,समीर देशमुख,सागर मोरे,विश्वास पवार,सतिश महाडीक,दत्तात्रय,महाडीक,सुशांत तवर,रामदास बाबर,किरण शिंदे उपस्थित होते.