जिजाऊ ग्रुप तर्फे निराधार व गोरगरीब महिलांना नेहमीच सहकार्य – सौ. संध्या पाटील*

Google search engine
Google search engine

*

सांगली /कडेगाव

सांगली जिल्ह्यातील मौजे चिंचणी येथील जिजाऊ ग्रुप तर्फे निराधार व गोरगरीब महिलांना नेहमीच
सहकार्य केले जाते असे सामाजिक कार्यकर्त्या सौ. संध्या पाटील यांनी सांगितले.
मौजे चिंचणी ता. कडेगाव येथील महिलांना लॉक डाऊन काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना त्या बोलत होत्या. त्यांनी सांगितले की, कोरोना च्या संकटात सर्व कामे बंद असल्यामुळे महिलांना घरातून बाहेर पडता येऊ शकत नाही त्यामुळे त्यांना मदत व्हावी या हेतूने जिजाऊ ग्रुप तर्फे चिंचणी गावातील गोरगरीब, निराधार महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केलेले आहे. जिजाऊ ग्रुप तर्फे नेहमीच सामाजिक काम सुरू असते. गेले 7 वर्षापासुन चिंचणी गावातील व परिसरातील महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात तसेच महिलांचे आरोग्य व इतर बाबतीत मार्गदर्शन शिबीर घेतली जातात . तसेच दरवर्षी वृक्षारोपण केले जाते आणि लावलेल्या झाडांचे संगोपन केले जाते.
कोरोना विषाणू च्या संकट काळात केंद्र सरकार, राज्य सरकार, विविध सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती, विविध उद्योग समूह यांचे तर्फे गोरगरीब, मजुरी करणार्‍या लोकांना मदत केली जात आहे. त्यामुळेच आपले सुद्धा कर्तव्य आहे असे समजून जिजाऊ ग्रुप तर्फे गोरगरीब महिलांना
जीवनाआवश्यक वस्तूंचे वाटप केलेले आहे.
यावेळी जिजाऊ ग्रुप च्या सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.