*बाहेर अडकलेल्या 924 विद्यार्थी व मजुरांची यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपिवली – माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची माहिती*

0
1384
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी:-*

अमरावती जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी शिकायला बाहेर जिल्ह्यात जातात, मजूर वर्ग तर बाहेर राज्यात कामाला जातो व बहुतांश नागरिक नोकरी करण्यासाठी महाराष्ट्र किव्हा भारताच्या विविध राज्यात जातात. परंतु आता कोरोनाच्या लॉकडाउन मुळे सर्वाना आपल्या घराची आस लागली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील विशेषतः मोर्शी वरुड तालुक्यातील बाहेर जिल्ह्यात व बाहेर राज्यात अडकलेल्या ९२४ विद्यार्थी व मजुरांची यादी त्यांना स्वगृही आणण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. नवाल यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.

देशात संपूर्णपणे कोरोना विषाणूचे सावट पसरलेले आहे. त्यात आपले घर सोडून कामाकरिता व शिक्षणाकरिता गेलेल्या लोकांची आता मोठी फजिती होत आहे, संपूर्ण लॉकडाउन जाहीर केल्यानंतर काही नागरिकांना तेथे राहणे कठीण झाले आहे. वरुड येथील काही विद्यार्थी व मजुरांनी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना कॉल द्वारे मागणी केली होती त्यावर डॉ. बोंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर अडकलेल्या विद्यार्थी व मजूर यांची माहिती मागितली, यामध्ये विशेषतः पुणे,मुंबई, औरंगाबाद येथे शिक्षणासाठी व नोकरीसाठी गेलेले विद्यार्थी व मजुरवर्ग भरपूर आहे. व महाराष्ट्र राज्याबाहेरील मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, तेलंगणा, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान आणि गोवा येथून बहुतांश लोकांची माहिती मिळाली. यामध्ये वरुड व मोर्शी तालुक्यासह अमरावती जिल्ह्यातील नावे आहेत. ही सर्व यादी माजीकृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिली व त्यांना येण्याची परवानगी तात्काळ देण्याची मागणी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी श्री. नवाल यांच्याकडे केली. यावेळी आमदार प्रताप अडसड, भाजपा जिल्हाध्यक्ष सौ. निवेदिता चौधरी, भाजपा अमरावती शहराध्यक्ष किरण पातूरकर उपस्थित होते.