पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 73 नागरिकांची नोंद

0
718
Google search engine
Google search engine

73 पैकी 57 स्वॅब घेतले ; 37 अहवाल निगेटिव्ह

20 अहवाल अद्याप अप्राप्त ; रुग्णाची प्रकृती स्थिर

14 व 15 मेला रुग्णाच्या स्वॅबची पुन्हा तपासणी करणार

चंद्रपूर- दि. 6 मे : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकमेव पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णाच्या संपर्कातील 73 नागरिकांची सूची तयार करण्यात आली आहे. यापैकी 57 नागरिकांचे स्वॅब (घशातील लाळ ) नमुने तपासण्यात आले आहे. त्यापैकी 37 अहवाल निगेटिव्ह आहेत.अद्याप 20 नागरिकांचा अहवाल अप्राप्त असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिली आहे.

चंद्रपूर महानगरात आढळून आलेल्या या पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबियातील सगळे, मुलगा, मुलगी व पत्नी तिघेही निगेटिव्ह आहेत. तर पॉझिटिव्ह रुग्ण ज्याठिकाणी रात्रपाळी मध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. त्या अर्पाटमेंटच्या सर्व 30 नागरिकांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नागपूर कोरोना प्रयोग शाळेत तपासणीसाठी गेलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 57 स्वॅब पैकी 37 स्वॅब नमुने निगेटिव्ह आले आहेत. अन्य 20 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. पॉझिटिव्ह रुग्णाची 14 व 15 मेला स्वॅबची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, आतापर्यंत एकूण घेण्यात आलेल्या 177 नमुन्यांपैकी 153 नमुने निगेटिव्ह आले आहे. 23 नमुने प्रतीक्षेत असून 1 रुग्ण फक्त पॉझिटिव्ह आढळून आला असल्याची माहिती, राठोड यांनी दिली आहे.