कोरोना संकटप्रसंगी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन

0
756
Google search engine
Google search engine

जिल्हा सहाय्यता निधीत; आतापर्यंत 69 लक्ष रुपये जमा

चंद्रपूर- दि.6 मे: कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील सरकारी, सहकारी संस्था व दानशूर व्यक्तीकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना संकट निवारणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.

आज प्रामुख्याने जिल्हा सहाय्यता निधीमध्ये धनश्री नागरी सह.पतसंस्था मुलच्या वतीने रु.21 हजार, धनश्री ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था तळोधीच्या वतीने रु.25 हजार, आनंद निकेतन महाविद्यालय सेवक सह. पतसंस्था वरोरा-ब्रह्मपुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ब्रह्मपुरीच्या वतीने प्रत्येकी रु.11 हजार, ब्रह्मपुरी शेतकी खरेदी विक्री सह. संस्था ब्रह्मपुरी, आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्था पळसगाव, विविध कार्यकारी सहकारी संस्था साठगाव, चिमूर मजूर सहकारी संस्था चिमूरच्या वतीने प्रत्येकी रु. 5 हजाराचा धनादेश सहायता निधी देण्यात आला.

त्यासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा ब्राह्मण सभा चंद्रपूरच्या वतीने रु.51 हजार, मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यालय गडचांदूरच्या वतीने रु.1 लक्ष 42 हजार200, मुख्याध्यापक, महात्मा गांधी विद्यालय नांदगाव सूर्या ता. कोरपनाच्या वतीने रु. 12 हजार 30 तर मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यालय सोनाली वन ता. कोरपनाच्या वतीने रु.20 हजाराचा धनादेश सहायता निधीस देण्यात आले.

मदत करायचीय ? या बँक खात्यात पैसे जमा करा !

कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक 960310210000048 असून यासाठी आयएफएससी कोड BKIDOOO9603 असा आहे. जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था, धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात. त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.