६५०० रुपयाच्या मोहादारू साठ्यासह आरोपीवर गुन्हा नोंद

0
893

सिंदेवाही पोलिसांची करवाई

सिंदेवाही- सिंदेवाही पोलीस येथील महिला कर्मचारी मपोकॉ अर्चना सिडाम ब.न. १९६२ व मपोकॉ योगिता पराते ब.न. १४२५ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हेटी वार्ड सिंदेवाही येथील रहवाशी अशोक रामाजी पाकेवार यांच्या घराच्या मागे अवैध्य दारू विक्री सुरु आहे. या आधारे सदर आरोपीच्या घरच्या मागे दारुबाबत झडती घेतली असता त्याठिकाणी एका पाण्याच्या प्लास्टिक कँनमध्ये २० लिटर हातभट्टी मोहादारू असा एकूण ६५०० रुपयाचा दारू साठा मिळुन आला. सदर आरोपीवर अप क्र. २२७/२०२० कलम ६५(ई), मदाका प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. हि कारवाई सहायक पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शिपाई अर्चना सिडाम व योगीता पराते यांनी केली.

विशेष बाब म्हणजे पोलीस स्टेशन सिंदेवाही तर्फे अवैध दारू विक्रेत्यांवर मोठ्याप्रमाणात काही दिवसांपासून कारवाई सुरु आहेत त्यामुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणानले आहेत.