कोरोना प्रतिबंधक उपायोजना पथकाने केला अवैध गुटखा जप्त

0
778
Google search engine
Google search engine

आकोटः ता.प्रतिनिधी

अकोट शहरामध्ये कोरोना प्रतिबंधक उपायोजना पथकाचे नायब तहसीलदार हरीश गुरव यांच्या गस्तीवरील पथकाने दि.६ ला अवैध गुटख्याची विक्री करणाऱ्यावर रीलायन्स पेट्रोलपंपामागे छापा टाकला.पथकाने यावेळी पंचनामा करुन प्रतिबंधित गुटखा जप्त करुन पुढील कारवाईसाठी अन्न सुरक्षा अधिकारी यांच्याशी संपर्क करत जप्त माल शहर पोलीसांच्या ताब्यात दिला.
या कारवाईत13655 रु.गुटखा व चार चाकी गाडी 180000 हजार रुपये दोन मोबाईल किंमत अंदाजे 4000 हजार असा एकूण 1लाख 97हजार 655 रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला

.यावेळी रवी नालट हा पथकाला गुटखा विक्री करतांना मिळुन आला.दरम्यान घटनास्थळी तहसिलदार राजेश गुरव हे व शहर पोस्टे चे उपनिरीक्षक ठाकुर हे पोहचले होते .सदर कारवाई नायब तहसिलदार हरीश गुरुव व पथकातील कर्मचारी गोपाल वानरे,राजेंद्र राठोड राजाभाऊ खामकर यांनी केली.