मंदिर बंद घरातच नृसिंह महाराज यांची पूजा पंचक्रोशीतील अनेक भाविकांची असते गर्दी चांदुर बाजार

Google search engine
Google search engine

मंदिर बंद घरातच नृसिंह महाराज यांची पूजा
पंचक्रोशीतील अनेक भाविकांची असते गर्दी

चांदुर बाजार:-

दिनांक 6 मे ला नृसिंह महाराज यांची जयंती होती. चांदुर बाजार तालुक्यातील काजळी देऊरवाडा या गावात प्राचीन नृसिंह महाराज यांचे मंदिर आहे.गावात तसेच गावाच्या बाहेर अनेक भाविकांचे हे कुलदैवत आहे.मात्र नृसिंह जयंती निमित्त कोरोना च्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

नृसिंह जयंती ला अनेक भाविक हे काजळी देऊरवाडा या गावी येत असतात मात्र कोरोना गंभीर परिस्थिती वर मंदिर प्रशासन यांनी मंदिर बंद ठेवले .तसेच संचारबंदी असल्याने देखील नागरिकांनी आपल्या घरीच नृसिंह महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी केली.